Trending Entertainment News: मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Top Entertainment News Today, 26 May 2022 : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Entertainment News Live 25 May
Trending Entertainment News Live Updates

Entertainment News Updates : मनोरंजन क्षेत्रात सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीची. करण जोहरनं नुकताच ५० वा वाढदिवस साजरा केला आणि त्याची धमाकेदार पार्टी दिली. या पार्टीला जवळपास सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र या पार्टीमध्ये घातलेल्या ड्रेसमुळे अभिनेत्री मलायका अरोराला सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. याशिवाय अभिनेता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates

Top Entertainment News Today, 26 May 2022 : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

19:01 (IST) 26 May 2022
Photos : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची एकूण संपत्ती आहे तरी किती?, सगळ्यात श्रीमंत कलाकारांनाही देतो टक्कर

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील टॉपचा कलाकार म्हणजे राम चरण. राम चरण त्याच्या चित्रपटांसाठी कोटी रुपयांमध्ये मानधन घेतो. इतकंच नव्हे तर राम चरणचं हैद्राबादमधील सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे. तो आज कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याची संपत्ती नेमकी किती आहे यावर आज आपण एक नजर टाकणार आहोत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

17:43 (IST) 26 May 2022
Photos : मराठमोळा साज! नाकात नथ, केसात गजरा अन् भरजरी शालूमध्ये खुललं पाठकबाईंचं सौंदर्य

अभिनेत्री अक्षया देवधरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. तिच्या मराठमोळ्या लूकवर तर चाहते फिदा होतात. पारंपरिक लूकमधीलच काही फोटो अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक, कमेंटचा वर्षाव होत आहे.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

16:52 (IST) 26 May 2022
“तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे” वडिलांसाठी भावूक झाला रितेश देशमुख, शेअर केली खास पोस्ट

महाराष्ट्राचे माजी मुूख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. वडिलांच्या जयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुख भावूक झाला आहे. रितेशने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच त्याने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. यामध्ये रितेशची दोन मुलं विलासराव देशमुख यांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:14 (IST) 26 May 2022
दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्या यासिन मलिकला जन्मठेप झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केले ट्विट, म्हणाले…

दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कौतुक केले आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:11 (IST) 26 May 2022
“मी लायक आहे की नाही…”, अभिनेता गौरव मोरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

विनोदवीर अभिनेता गौरव मोरेला भिमरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:29 (IST) 26 May 2022
धक्कादायक! पल्लवी डेच्या आत्महत्येनंतर २१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा राहत्या घरीच आढळला मृतदेह

२१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री बिदीशा डे मजुमदारच्या (Bidisha De Mujumdar) मृत्युची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून काम करत असणाऱ्या बिदीशाचा तिच्या राहत्या घरीच मृतदेह आढळला आहे. फक्त वयाच्या २१ वर्षी बिदीशाचा मृत्यु होणं ही धक्कादायक बाब आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:11 (IST) 26 May 2022
मराठमोळा दिग्दर्शक करणार करण जोहरसोबत काम, पोस्ट शेअर करत म्हणाला; “मला कधीच वाटलं नव्हतं…”

करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी अक्षय इंडीकरने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहून त्याला शुभेच्छा दिल्या. यासोबतच लवकरच तो करण जोहरसोबत काम करणार असल्याची गोड बातमीही शेअर केली. अक्षय इंडीकरची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट करत अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

14:10 (IST) 26 May 2022
“टॉप घालायला विसरली…” करण जोहरच्या पार्टीतील लुकमुळे मलायका अरोरा ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंगमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणारी मलायका अरोरा आघाडीच्या अभिनेत्रींना ड्रेसिंगच्या बाबतीत टक्कर देते. नुकतीच मलायकानं दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळच्या तिच्या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:08 (IST) 26 May 2022
VIDEO : हातात हात घालून एंट्री केली अन्…; गर्लफ्रेंडला घेऊन पार्टीमध्ये पोहोचला हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. आता तर चक्क हृतिक सबाला घेऊन दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थ पार्टीला पोहोचला होता.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:06 (IST) 26 May 2022
VIDEO : “घटस्फोट म्हणजे खेळ नव्हे”, आमिर खान-किरण रावचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापले लोक

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण रावने जवळपास १५ वर्ष एकत्र संसार केला. मात्र गेल्या वर्षी दोघांनीही सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला असला तरी आमिर-किरणमध्ये अजूनही चांगली मैत्री असल्याचं दिसतं. करण जोहरच्या ५०व्या बर्थ डे पार्टीला दोघांनीही हजेरी लावली होती.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:04 (IST) 26 May 2022
Birthday Special : ‘तारक मेहता…’मधील जेठालाल आहे कोटी रुपयांचा मालक, सुपरहिट मालिकेमुळे बदललं नशिब

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमधील जेठालाल या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन दाद देतात. अभिनेते दिलीप जोशी यांनी ही भूमिका छोट्या पडद्यावर उत्तम साकारली आणि आजही त्यांची ही मालिका लोकप्रिय आहे. अभिनेते दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्याचनिमित्त त्यांचं खरं आयुष्य नेमकं कसं आहे? यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

संपूर्ण फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

12:48 (IST) 26 May 2022
अनुष्का शर्माने पार्टीसाठी परिधान केला ग्लॅमरस ड्रेस, विराट कोहली म्हणाला…

नुकतंच अभिनेत्री अनुष्का शर्माने दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी अनुष्का शर्माने काळ्या रंगाचा अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड ड्रेस परिधान केला होता.

पाहा सर्व फोटो

12:46 (IST) 26 May 2022
“मी बोल्ड कपडे घालते म्हणून त्यांनी कात्रीने…”, उर्फी जावेदचा खुलासा

नुकतंच एका मुलाखतीत उर्फी जावेदने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. “माझ्या एका नातेवाईक कात्रीने माझे कपडे कापले होते”, असे उर्फी जावेद म्हणाली.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Top Entertainment News Today, 26 May 2022 : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Web Title: Trending entertainment news live karan johar 50th birthday bash anushka sharma virat kohli bollywood gossips movie review online 26 may

Next Story
“मी लायक आहे की नाही…”, अभिनेता गौरव मोरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी