Entertainment Latest News : मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

Trending Entertainment News Updates 23 May : मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Manoranjan News Live Updates : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टी विरुद्ध दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा वाद शिगेला पोहोचला आहे. यावर अनेक कलाकार पुढे येऊन प्रतिक्रिया देत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे सध्या कान्स महोत्सव २०२२ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, हेली शाह, हिना खान यांच्या लुकची बरीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे. सध्या कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाची बरीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

Live Updates
19:47 (IST) 23 May 2022
“योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम”, अभिनेता सुमित राघवनचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन सोशल मीडियावर फारच सक्रिय असतो. आता देखील त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत असताना त्याने योगी आदित्यनाथ यांचं कौतुक देखील केलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

17:18 (IST) 23 May 2022
४ कोटी रुपयांचं घड्याळ, चार्टर विमान अन् बरंच काही, ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

दाक्षिणात्या सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचे जगभरात चाहते आहेत. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलासृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. ज्युनिअर एनटीआर दिसायला जरी साधा असला तरी तो कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

16:33 (IST) 23 May 2022
“पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा”, आशा भोसले यांचा महिलांसाठी कानमंत्र

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या अनेकदा काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. अनेक लहान मुलं तुमचं पाहून खायला शिकतात. जर तुम्ही त्याच्यासमोर पिझ्झा खाल्ला तर ती लहान मुलं देखील ते खाणार. तुम्ही भाकरी का खात नाही? असे आशा भोसले म्हणाल्या.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

16:29 (IST) 23 May 2022
रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, ‘झुंड’नंतर आणखी एका नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचा टीझर नुकतचं प्रदर्शित झाला आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

15:50 (IST) 23 May 2022
Photos : लंडनच्या रस्त्यावर एकटीच का फिरतेय सारा अली खान? स्टारकिडचे फोटो आले समोर

अभिनेत्री सारा अली खान सध्या लंडनमध्ये सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे. पण यावेळी ती मित्र-मैत्रीण किंवा कुटुंबाबरोबर नव्हे तर एकटीच लंडनमध्ये फिरत आहे. याचदरम्यानचे काही फोटो साराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

14:26 (IST) 23 May 2022
“…तर मी कायदेशीर कारवाई करेन” करण जोहरवर संतापला पाकिस्तानी गायक, गाणं चोरी केल्याचा आरोप

दिग्दर्शक करण जोहरचा आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही तासांमध्येच हा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं कॉपी केल्याचा आरोप करणवर होत आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:27 (IST) 23 May 2022
Video : ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी, म्हणाली “प्रमोशनच्या गडबडीत…”

'चंद्रमुखी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:25 (IST) 23 May 2022
“पुष्पा, आरआरआर चित्रपट सुपरहिट ठरले आणि…”, बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर स्पष्टच बोलला करण जोहर

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा रंगत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान करणने बॉलिवूड आणि साऊथ वादावर आपलं मत व्यक्त केलं.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:23 (IST) 23 May 2022
सलमानच्या सांगण्यावरुन संजय लीला भन्साळींना भेटली कंगना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “तू तर…”

कंगना रणौतला सलमान खानने संयज लीला भन्साळी यांना भेटण्याचा फार पूर्वी सल्ला दिला होता. पण तेव्हा नेमकं काय घडलं? हे तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:18 (IST) 23 May 2022
‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून आयुष शर्मा बाहेर, सलमान खानसोबत बिनसल्याच्या चर्चांना उधाण

अभिनेता सलमान खान आणि शहनाज गिलचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्यासोबत चित्रपटाबाबत मतभेद झाले आहे. मात्र आता काहीतरी वाद झाल्याने त्याने या चित्रपटातून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Trending entertainment news live latest bollywood happening manoranjan batmya marathi movie actors actress news updates on 23 may

Next Story
सलमानच्या सांगण्यावरुन संजय लीला भन्साळींना भेटली कंगना, सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “तू तर…”
फोटो गॅलरी