Trisha Krishnan in Vijay Oath Swearing Ceremony : जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपालांनी विजय यांना मुख्यमंत्री आणि गोपनियतेची शपथ दिली. सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडीनंतर जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्रिशा कृष्णन हिने खास दाक्षिणात्य लूक केला होता.
चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांचा शपथविधी सोहळा पडला. या सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह सिनेविश्वातील कलाकारांनी उपस्थिती लावली. या सगळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीची चर्चा रंगली आहे. जोसेफ विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना त्रिशा कृष्णन आवर्जून उपस्थित राहिली. विजय यांच्या राजकीय यशाचा आनंद त्रिशाच्या चेहऱ्यावर झळकत होता. तिने उपस्थितांना अभिवादन करताच सभागृहामध्ये एकच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.
खास दाक्षिणात्य लूक
जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनने खास लूक केला. दक्षिण भारताच्या समृद्ध संस्कृती,परंपरा आणि अभिजात वारशाचे प्रतीक मानली जाणारी आकर्षक रेशमी साडी तिने नेसली आहे. आकाशी निळ्या रंगासह गोल्डन काठ असलेल्या या साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलले होते.यासह जरतारीचा ब्लाऊज तिने स्टाईल केला होता. याचबरोबर त्रिशाने लाल डायमंड नेकलेस परिधान केला होता. तसेच केसांमध्ये माळलेला गजरा आणि कपाळावरील टिकली उठून दिसत होती. तिच्या साधेपणामध्ये तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या या लूकची चर्चा होताना दिसत आहे.
#WATCH | Tamil Nadu: Actor Trisha Krishnan at the Jawaharlal Nehru Stadium in Chennai, where TVK Chief C Joseph Vijay will take oath as the Chief Minister of Tamil Nadu, shortly. pic.twitter.com/oCevs6N1Wx
— ANI (@ANI) May 10, 2026
त्रिशाच्या वाढदिवशी विजय यांचे अभूतपूर्व यश
तमिळनाडूच्या निवडणुकांमध्ये जोसेफ विजय यांच्या ‘TVK’ पक्षाने विजयश्री खेचून आणला. ४ मे रोजी निवडणुकांचा निकाल हाती आला आणि विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. आश्चर्यकारक बाब म्हणजे याच दिवशी अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा ४३ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या खास दिवशीच विजय यांनी खास मैत्रीण त्रिशाला तमिळनाडूचा भव्य निकाल भेट दिल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली. निकालाच्या दिवशीदेखील विजयच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी त्यांच्या चेन्नईच्या निवासस्थानी दाखल झाली होती. निवडणुकांच्या निकालानंतर त्रिशा कृष्णन ही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
Tamil Nadu: Actor Trisha Krishnan at the Jawaharlal Nehru Stadium in Chennai, where TVK Chief C Joseph Vijay will take oath as the Chief Minister of Tamil Nadu, shortly. pic.twitter.com/VmvDUqIjIq
— ANI (@ANI) May 10, 2026
विजय आणि त्रिशाच्या अफेअरच्या चर्चा
त्रिशा कृष्णन व जोसेफ विजय हे एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा सुरू आहेत.अभिनेत्याच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करताना त्याचे लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा केला होता. परंतु, दोघांनीही अद्याप याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयचे अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर अफेअर असल्याचे अनेक महिन्यांपासून म्हटले जातेय.
