Trisha Krishnan Instagram post After Thalapathy Vijay CM swearing-in ceremony : दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. चेन्नईमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या त्रिशाने साडीतले तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला तिने दिलेल्या कॅप्शनने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं आहे
विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबद्दल अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघांनीही या चर्चांवर कधीही सार्वजनिकपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. अलीकडेच विजय यांच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल करत विजय यांचे लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाह बाह्य संबंध असल्याच्या दावा केला होता. तेव्हापासून या दोघांबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चात सुरू झाल्या. अशातच आता विजय यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशाने पोस्ट शेअर करत लिहिलेल्या कॅप्शनने पुन्हा नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.
पोस्टमधून त्रिशा नेमकं काय म्हणाली?
अभिनेत्रीने नुकतच इन्स्टाग्रामवर अॅक्वा-ब्लू रंगाच्या सिल्क साडीतले काही फोटो शेअर केले आहेक. सोन्याच्या जरीची नक्षी असलेल्या या साडीवर तिने ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाऊज आणि साधे दागिने परिधान केले होते. त्रिशा कृष्णनच्या या पोस्टने सोशल मीडियावर लगेचच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टला त्रिशाने ‘प्रेम कायम सगळ्यात प्रभावी असतं’ अशी कॅप्शन दिली आहे. अनेकांनी या पोस्टचा संबंध विजयशी लावला आहे. अनेकांनी पोस्टखाली कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे. त्रिशा १० मे रोजी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. यावेळी तिच्याबरोबर तिची आई उमा कृष्णन देखील होत्या.
त्रिशा कृष्णन आणि विजय यांच्या रिलेशनशिपच्या अफवा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दोघांनीही अनेक सुपरहिट तमिळ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधीही सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही किंवा त्यांच्या नात्याची अधिकृतपणे पुष्टीही केलेली नाही.
पहिल्याच प्रयत्नात विजय यांना राजकारणात मिळालं मोठं यश
दरम्यान, विजय यांच्या राजकारणातील प्रवेशाची तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. त्यांच्या टीव्हीके या पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता मिळवली. यानंतर काँग्रेस, CPI, CPI(M), VCK, IUML आणि AMMK या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यात आलं. २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत या आघाडीने बहुमताचा आकडा पार केला.
