Trisha Krishnan Marathi Connection : दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या अभिनेता विजयबरोबरच्या अफेअरच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. या सर्व चर्चांवर त्रिशाने बोलणं टाळलं असून ती तिच्या आउटिंगचे फोटो पोस्ट करतेय. नुकतीच त्रिशा मुंबईला आली होती. तेव्हा तिने शेअर केलेल्या एका फोटोने लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या फोटोचं खास मराठी कनेक्शन आहे.

त्रिशा फॅशन आणि कॉस्च्युम डिझायनर एका लखानी हिच्या लग्नाला मुंबईला आली होती. या लग्नात बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यापैकीच त्रिशा एक होती. त्रिशाने या लग्नात निळ्या व चंदेरी रंगाची सुंदर साडी नेसली होती. या साडीतील फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

त्रिशाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्रिशाबरोबर एक तरुण व एक महिला दिसत आहेत. “तुमच्या दोघांचेही खूप आभार, माझे कॉन्स्टंट्स” असं त्रिशाने या फोटोवर लिहून त्या दोघांना टॅग केलं आहे.

trisha krishnan photo with marathi people
त्रिशा कृष्णनने पोस्ट केलेला फोटो (सौजन्य- इन्स्टाग्राम)

त्रिशाच्या फोटोतील दोघे कोण?

त्रिशाच्या फोटोत दिसणारे हे दोघे कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ते दोघेही मराठी आहेत. फोटोत दिसणाऱ्या तरुणाचे नाव उमेश पवार आहे. तो मराठी असून सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. बऱ्याच वर्षांपासून तो त्रिशाबरोबर काम करतोय. अनेक चित्रपटांसाठी त्यानेच त्रिशाचा मेकअप केला आहे. तर, या फोटोतील महिलेचं नाव रोहिणी कदम आहे. रोहिणी कदम ही हेअर स्टायलिस्ट आहे. तीदेखील सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट असून अनेक वर्षांपासून त्रिशाबरोबर काम करतेय. त्रिशाने या दोघांचाही फोटो पोस्ट करून त्यांचे आभार मानले आहेत.

त्रिशा व विजयच्या अफेअरच्या चर्चा

विजयच्या पत्नीने त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी, विजय आणि त्रिशा चेन्नईत एका लग्नाच्या रिसेप्शनला एकत्र दिसले. दोघे तिथे एकाच गाडीतून आले होते. लग्नाच्या मंचावरही त्यांनी एकत्र फोटो काढले. हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कोण आहे एका लखानी?

एका लखानी फॅशन आणि कॉस्च्युम डिझायनर आहे. तिने हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. ‘रावण’ चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २०१३ पासून ती दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटांसाठी मुख्य कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत आहे. त्रिशाने मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटात काम केलं होतं. त्रिशा व एका दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत.