scorecardresearch

Premium

साऊथ सुपस्टार त्रिशा कृष्णन लवकरच बांधणार लग्नगाठ? चर्चांना उधाण

८ वर्षांपूर्वी त्रिशाचा साखरपुडा मोडला होता. त्यानंतर तिने लग्नाचा विचार सोडून दिला होता.

trisha krishna
साऊथ सुपस्टार त्रिशा कृष्णन लवकरच बांधणार लग्नगाठ

साऊथ सुपरस्टार त्रिशा कृष्णन सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्रिशा लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.ॉ

हेही वाचा- “पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”

rhea chakraborty talks about sushant singh rajput death
“त्याने त्याचा जीव का घेतला हे…”, रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या मृत्यूवर भाष्य; म्हणाली, “मला काळी जादू…”
Pakistani actor Mahira Khan ties the knot for second time with Salim Karim gets
Video: ‘रईस’ फेम माहिरा खानने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, पहिल्या नवऱ्यापासून आहे १३ वर्षांचा मुलगा; कोण आहे दुसरा पती?
Madhura deshpande
‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….
iran khan, aamir khan
Video: “आत्महत्येचा विचार…”, आमिर खानच्या लेकीने केलं स्पष्ट भाष्य, आयराचा व्हिडीओ चर्चेत

त्रिशा कृष्णन एका मल्याळम निर्मात्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तसेच तिच्या लग्नाची तारीखही जाहीर झालेली नाही. पण लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधीही अनेक वेळा त्रिशा कृष्णनने तिच्या लग्नाबद्दल उघडपणे भाष्य केले होते. त्रिशा म्हणालेली, की, अविवाहित असले तरी मी आनंदी आहे. सध्या मी लग्नाचा विचार करु इच्छित नाही. माझे लग्न जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. मला कसलीही घाई नाही.” काही जबाबदारीमुळे लग्न करायचं नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.

हेही वाचा- परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, पहिला फोटो आला समोर

तृषा कृष्णनने २०१५ मध्ये बिझनेसमन वरुण मनियनसोबत साखरपुडा केला होता. मात्र, साखपुड्याच्या तीन महिन्यांनंतरच त्यांचे लग्न तुटले. यानंतर, अभिनेत्री २०२० मध्ये त्रिशा सिलांबरसन टीआरसोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे प्रसिद्धीझोतात आली. त्रिशा आणि सिम्बूने ‘विनैतांडी वरुवाया’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता त्रिशा थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कंग्रज यांच्याबरोबर ‘लिओ’ चित्रपटात दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trisha krishnan ready to tie know with malayalam producer rumors dpj

First published on: 21-09-2023 at 10:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×