‘नवाब’ सैफ अली खानचं ट्रोल्सना मजेशीर उत्तर

अरबाज खानने सैफला ट्रोलिंगवर व्यक्त होण्याची संधी दिली.

saif ali khan
सैफ अली खान

सोशल मीडियाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. एखादा फोटो किंवा पोस्टवर ट्रोलिंग, टिकाटिप्पणी या गोष्टी होतच असतात. विशेषत: सेलिब्रिटी या गोष्टींना अनेकदा सामोरं जात असतात. काहीजण अशा ट्रोलिंगना थेट उत्तर देतात तर काहीजण मौन बाळगणंच पसंत करतात. अभिनेता अरबाज खान त्याच्या ‘चॅट शो’मध्ये सेलिब्रिटींना ट्रोलिंगवर व्यक्त होण्याची संधी देतो. यंदा शोमध्ये बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खानने हजेरी लावली.

सैफला सर्वजण ‘नवाब’ म्हणतात. ‘नवाब’ म्हटल्यावर तुला कसं वाटतं असा प्रश्न अरबाजने सैफला विचारला. यावर सैफने मजेशीर उत्तर दिलं. ‘नवाब होण्यात मला कधीच रस नव्हता. त्यापेक्षा मी कबाब खाणं पसंत करेन,’ असं तो म्हणाला. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सैफचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. त्याला अत्यंत साधं राहणं आवडतं. अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात त्याने पांढरा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. त्याच्या या साध्या लूकबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘लग्न तिचं होतं माझं नाही.’ सैफच्या या उत्तरांनी अरबाजची बोलतीच बंद झाली असं म्हणायला हरकत नाही.

सध्या सैफ ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रेक्षकांमध्ये या सिझनची फार उत्सुकता आहे. याशिवाय तो ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ आणि ‘जवानी जानेमन’ या चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Troll attacks saif ali khan on being a nawab he gives hilarious response