scorecardresearch

स्वरा आणि तिच्या बाबांची होणार का भेट? ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवं वळण

मालिकेचा नवा प्रोमो सध्या बराच चर्चेत आहे.

tujhech me geet gaat ahe, abhijit khandkekar, urmila kanitkar kothare, tujhech me geet gaat ahe serial, tujhech me geet gaat ahe new promo, तुझेच मी गीत गात आहे, अभिजित खांडकेकर, उर्मिला कानिटकर कोठारे, तुझेच मी गीत गात आहे नवा प्रोमो
स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. एकीकडे आईला गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे मामीकडून होणारा जाच. या सर्वात स्वराने मामाच्या सांगण्यावरुन वेष बदलून बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबई गाठली.

मायानगरी मुंबईत वडिलांचा शोध घेण्यासोबतच स्वराचा जगण्यासाठीही संघर्ष सुरु झालाय. रहायचं कुठे हा प्रश्न तर आहेच. मात्र पोट भरण्यासाठीही तिला बरीच धडपड करावी लागतेय. बाबांची लवकरात लवकर भेट व्हावी अशी तिची इच्छा असतानाच योगायोगाने साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात. मंदिरात दोघं एकत्र येतात खरे पण बाप-लेकीची भेट होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे.

आणखी वाचा- “…आणि रिक्षातच त्यांनी आईच्या कुशीत प्राण सोडला” वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्याची भावूक पोस्ट

ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सीनसाठी एक खास गाणं बनवण्यात आलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वरा बनसोडेने हे गाणं गायलं असून कौशल इनामदार यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याचे शब्द हेमंत सोनावणे आणि दीप्ती सुर्वे यांच्या लेखणीतून उतरले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tujhech me geet gaat ahe new tweest in serial will swara able to meet her father mrj