Photos : ‘तुला पाहते रे’ मालिकेतील कलाकारांची धुळवड

होळी म्हणजे रंगांचा सण आणि रंगांमध्ये सर्वजण रंगले आहेत.

tula pahate re
तुला पाहते रे

देशभरात धुळवडीची धमाल आहे. होळी म्हणजे रंगांचा सण आणि रंगांमध्ये सर्वजण रंगले आहेत. यात कलाकारसुद्धा मागे नाहीत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’च्या कलाकारांनीही सेटवर धुळवड साजरी केली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा सुबोध भावे आणि इशा निमकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह मालिकेची टीम या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नानंतर इशा आणि विक्रांतची पहिली होळी असणार आहे. ही रंगांची उधळण प्रेक्षकांना मालिकेतही पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच डोक्यावर उचलून घेतलं होतं. त्यातच मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यांमुळे ही मालिका विशेष चर्चेत असते. मालिकेत बेडेकर चाळीत रंगपंचमी अगदी उत्साहात साजरी करतात आणि हा सण बेडेकर चाळीत साजरा करण्यासाठी इशाचे आई बाबा सरंजामे कुटुंबियांना आग्रहाचे निमंत्रण द्यायला येतात. ते निमंत्रण स्वीकारून सरंजामे कुटुंबिय बेडेकर चाळीत होळी साजरी करणार आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tula pahate re actors holi celebration subodh bhave gayatri datar

ताज्या बातम्या