‘शिप ऑफ थिसीएस’ आणि ‘तुंबाड’सारख्या चित्रपटांमुळे आनंद गांधी हे नाव घराघरात पोहोचलं. विशेष म्हणजे या चित्रपटांमुळे त्यांची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकण्यापासून ते आतापर्यंत भारताबाहेर सर्वाधिक पाहिली गेलेली डॉक्युमेंटरी म्हणून मान्यता मिळवण्यापर्यंत आनंद गांधींच्या ‘An Insignificant Man’ ने इतिहास रचला. ‘तुंबाड’नंतर त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच त्यांनी यावर्षीचा जबरदस्त हीट ठरलेला कन्नड चित्रपट ‘कांतारा’बद्दल मत व्यक्त केलं आहे. ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर साऱ्या जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी या चित्रपटाची तुलना थेट ‘तुंबाड’शी केली आहे. याबद्दलच आनंद गांधी यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल

‘कांतारा’ बघून झाल्यावर या चित्रपटात आणि ‘तुंबाड’मध्ये बराचा फरक असल्याचं आनंद यांनी स्पष्ट केलं आहे. ट्वीट करत आनंद म्हणाले, “कांतारा झ तुंबाडसारखा अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजतील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”

आनंद गांधी यांच्या या वक्तव्यावरून हा चित्रपट त्यांना फारसा आवडला नसल्याचा अंदाज लावला जात आहे. तसेच त्यांच्या या ट्वीटला समर्थन देणारी लोकही याबद्दल भाष्य करत आहेत. ‘कांतारा’ देशातील बऱ्याच चुकीच्या गोष्टींचं उदात्तीकरण करतो असा बऱ्याच लोकांनी आरोप केला आहे. रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. या चित्रपटाने ४०० कोटीची कामावून वेगळाच इतिहास रचला आहे. कन्नड चित्रपटविश्वातील ‘कांतारा’ एक महत्त्वाचा चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tumbbad writer prodcuer anand gandhi says kantara celebrates toxic masculinity avn
First published on: 03-12-2022 at 13:36 IST