scorecardresearch

“तू काय आहेस हे…” तुनिषा शर्माने कथित बॉयफ्रेंड शिझानसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेत्री तुनिषा शर्माने काल दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

“तू काय आहेस हे…” तुनिषा शर्माने कथित बॉयफ्रेंड शिझानसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेत्री तुनिषा शर्माने काल दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वजण दुःख व्यक्त करत आहेत. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती. तिच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर तिच्याबद्दल नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

पोलीस तिच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. तुनिषा शर्माने सहकलाकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समजत आहे. तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवलं अशीही माहिती समोर आली. तुनिषाच्या बॉयफ्रेंडवर तुनिषाच्या आईने आरोप केल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशातच तुनिषाने तिच्या बॉयफ्रेंडसाठी लिहिलेली एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

आणखी वाचा : २० वर्षीय तुनिषा शर्माच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा ऐकून व्हाल थक्क

शिझान मोहम्मद खान असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. तुनिषाबरोबर तोही ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील काम करत होता. गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक पुरुष दिनाच्या निमित्ताने तिने शिझानसाठी एक पोस्ट लिहिली होती.

शिझानबरोबरचा एक फोटो पोस्ट करत तिने त्याला जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा देत लिहलं होतं, “मला अशाच प्रकारे उंचावणाऱ्या माणसाला जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! माझ्या आयुष्यातील सर्वात मेहनती, जिद्दी, अत्यंत उत्साही आणि सर्वात सुंदर माणूस! तू काय आहेस, हे तुला माहित नाही आणि हिच सर्वात सुंदर गोष्ट आहे. पुरुषांनी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी केलेले योगदान आणि त्याग ओळखण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची हीच वेळ आहे! सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!” तिची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : “एक मुलगी कशी काय…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येबाबत प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केला संशय

तुनिषाने ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ या चित्रपटांमध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 11:58 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या