अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या नंतर कलाक्षेत्राला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तुला आयुष्य संपवावं लागलं, यावर अनेक चर्चा झडत आहेत. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटकर करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये आता भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील उडी घेतली आहे.

इंडिया टुडेशी बोलत असताना राम कदम यांनी या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करतील असे मत व्यक्त केले. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, असे सांगितले. लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील, असे राम कदम यांनी सांगितले आहे.

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

आत्महत्या केलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा होती गरोदर? बॉयफ्रेंडचा उल्लेख करत पोलिसांच्या सुत्रांनी दिली धक्कादायक माहिती

काल (दि. २४) दुपारी तुनिषाने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काल रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी पोलिसांनी तपासाची अधिकृत माहिती दिलेली नाही. शिझान खानची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीसांच्या तपासात काय निष्पन्न होते, हे समोर येईल.

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी याआधी देखील लव्ह जिहाद या विषयावर अनेकदा आवाज उचलला आहे. वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यावेळी देखील राम कदम यांनी लव्ह जिहादचा विषय मांडला होता. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची लव्ह जिहादच्या अँगलने चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याही प्रकरणात त्यांनी हीच मागणी पुन्हा लावून धरली आहे.

सध्यातरी लव्ह जिहादचा प्रकार आमच्यासमोर नाही

दरम्यान मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी तुनिषा आत्महत्या प्रकरणात कोणताही लव्ह जिहादचा अँगल नसल्याचे म्हटले आहे. शिझानच्या अटकेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की, “आमची चौकशी सुरु आहे. तुनिषा आणि शिझानचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्यातरी इतर प्रेम प्रकरण किंवा लव्ह जिहादचा मुद्दा दिसत नाही.”