तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. मालिकेच्या सेटवरच तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाचा एक्सबॉयफ्रेंड म्हणजेच शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून शिझानला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तो पोलीस कोठडीत होता.

मालिकेच्या सेटरवर दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटे बोलणं

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

शिझानच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी शूटिंगदरम्यान लंच ब्रेकमध्ये शिझान तुनिषाला भेटला होता. दोघांमध्ये जवळपास १५ मिनिटं बोलणं झालं आणि त्यानंतर शिझान शूटिंगसाठी निघून गेला. यानंतर थेट काही वेळाने तुनिषाचा मृतदेह बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Video : रुग्णालयामध्ये तुनिषा शर्माचा मृतदेह पाहून आईची झाली अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही हळहळले

तुनिषाव्यतिरिक्त होती आणखी एक गर्लफ्रेंड?

तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. शिझानने तुनिषाची फसवणूक केली आहे, असा दावा तुनिषाच्या आईने केला आहे. तो तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीबरोबरही होता. त्याने माझ्या मुलीचा वापर केला, असे अनेक आरोप तुनिषाच्या आईने त्याच्यावर केले आहेत. या आरोपानंतर पोलीस शिझानच्या कथित गर्लफ्रेंडचा शोध घेत आहेत. शिझानने दुसऱ्या मुलीसाठी तुनिषाशी ब्रेकअप केलं होतं, असं तिच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.

हेही वाचा >>> “धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर…”, तुनिषाच्या आईचे शिझान खान व कुटुंबियांवर गंभीर आरोप

दरम्यान, तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. “शिझान व त्याच्या कुटुंबियांकडून तुनिषावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात होता. तिला बुरखा घालण्यासाठीही शिझानच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. शिझानची बहीण फलक नाझने तिला जबदरस्तीने हातावर टॅटू काढायला लावला. मला कुत्रे आवडत नाहीत. तरी मला सरप्राइज देण्यासाठी सांगितलं”, असे गंभीर आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत.