scorecardresearch

Tunisha Sharma Suicide : ब्रेकअपचा आघात सहन करू शकली नाही तुनिषा? आत्महत्येच्या आधी शेवटच्या १५ मिनिटांत काय घडलं?

ब्रेक अप झाल्यानंतरही तुनिषाला शिझान आयुष्यात असणं महत्त्वाचं वाटत होतं, पण तिने आयु्ष्य संपवलं

Tunisha Sharma Suicide : ब्रेकअपचा आघात सहन करू शकली नाही तुनिषा? आत्महत्येच्या आधी शेवटच्या १५ मिनिटांत काय घडलं?
Tunisha sharma suicide case shocking facts sheezan khan affair breakup depression What Happened in Last 15 Minutes


असं म्हणतात की प्रेम माणसाला काहीही करायला भाग पाडतं. अगदी काहीही.. कधी कधी टोकाचं पाऊलही उचलायला भाग पाडतं. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात आपल्याला हेच पाहण्यास मिळालं. २० वर्षांच्या तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. टीव्ही जगतातल्या अवकाशातून तुनिषा नावाचा नुकताच चमकू लागणारा तारा कायमचा निखळला. शिझान खानच्या मेक अप रूममध्ये तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली

२४ डिसेंबरला आली तुनिषाच्या आत्महत्येची बातमी
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २४ डिसेबंरला अलीबाबा या मालिकेच्या सेटवर सगळं काही नॉर्मल होतं. रोजच्या प्रमाणेच त्या दिवशीही शुटिंग सुरू होतं. याच दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास शिझान खानच्या मेकअप रूममध्ये तुनिशा फास लागलेल्या अवस्थेत सापडली. शिझानने मेकअप रूमचा दरवाजा ठोठावला. तुनिशाला हाकाही मारल्या.. शेवटी तुनिषा दार उघडत नाही म्हटल्यावर ते तोडण्यात आलं. तुनिशा गळफास लावलेल्या अवस्थेत होती. तिला खाली उतरवून रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर अभिनेत्रीच्या नातेवाईकांनी आरोप केले आहेत.

शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
तुनिषा शर्मा प्रेगनंट असल्याच्या बातम्या तिच्या मृत्यूनंतर पसरल्या होत्या. मात्र पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रूग्णालयात पाठवला होता. या रूग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर नव्हती हे समोर आलं. फास लागून श्वास कोंडल्याने तुनिषाचा मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या आणि तिची हत्या झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

२४ तारखेला शेवटच्या १५ मिनिटांमध्ये काय घडलं?
२४ डिसेंबरला तुनिशा शर्मा सकाळी अत्यंत आनंदात सेटवर गेली होती. शिझान आणि तुनिषा या दोघांनी दुपारी ३ वाजता सोबत जेवणही केलं. त्यानंतर सव्वा तीन वाजता तुनिषा शर्माचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत सापडला. ३ वाजेपर्यंत जी मुलगी नॉर्मल होती तिने सव्वा तीन वाजता इतकं टोकाचं पाऊल कसं काय उचललं? त्यामागे काय कारण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

तुनिषा आणि शिझानचं ब्रेक अप १५ दिवसांपूर्वीच झालं
तुनिषा आणि शिझान या दोघांचं ब्रेक अप १५ दिवसांपूर्वीच झालं होतं. तुनिषाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही मागच्या सहा महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र तुनिषाने चुकून एकदा शिझानचे चॅट वाचले. त्यावेळी शिझान आपल्याला फसवतोय हे तिच्या लक्षात आलं. याचा परिणाम या दोघांचं ब्रेक अप होण्यात झाला. ब्रेक अप झाल्यानंतर तुनिषा खूपच तणावात होती असंही तिच्या आईने पोलिसांना सांगितलं. तुनिषाने आईला हेदेखील सांगितलं होतं की जरी माझं शिझानसोबत ब्रेक अप झालं असेल तरीही मला तो माझ्या आयुष्यात हवा आहे. त्यानंतर तुनिषाच्या आईने शिझानच्या कुटुंबासोबतही चर्चा केली होती. शिझानने माझ्या मुलीच्या आयुष्यात परतावं अशी विनंतीही आपण केल्याचं तिच्या आईने सांगितलं मात्र शिझानच्या कुटुंबाने त्यांचं ऐकलं नाही

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे विचलीत झाल्याने तुनिषापासून विभक्त झालो, शिझान खानचा दावा.

तुनिषाच्या मृत्यूनंतर कोलमडून गेली आई
तुनिषाच्या मृत्यूनंतर तिची कोलमडून गेली आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शिझानला या प्रकरणात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. शिझानने तुनिषाला फसवलं आहे. त्याने तुनिषासोबत नातं बनवलं, तिला लग्नाचं आश्वासन दिलं त्यानंतर तिच्यासोबत ब्रेक अप केलं. यामुळेच तुनिषाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. शिझानच्या आयुष्यात एक मुलगी होती तरीही त्याने माझ्या मुलीला म्हणजेच तुनिषाला खेळवलं असाही आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.

प्रकरणाला दिला जातो आहे लव्ह जिहादचा रंग
तुनिषाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला भाजपाकडून लव्ह जिहादचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी या सगळ्या प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल असेल तर चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे. त्यामुळे आता या अँगलने पोलीस तपास करणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Tunisha Sharma Suicide: तुनिषासोबत ब्रेकअप का केलं? शिझानने पोलिसांना नेमकं काय कारण सांगितलं?

शिझानने पोलिसांना दिलेल्या जबाबात काय म्हटलं आहे?
शिझान खानने पोलिसांना जो जबाब दिला आहे त्यात त्याचं म्हणणं असं आहे की श्रद्धा वालकर प्रकरण ऐकून मी खूपच अस्वस्थ झालो होतो. माझा आणि तुनिषाचा धर्म वेगवेगळा आहे त्यामुळेच मी तिच्यासोबत ब्रेक अप करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 19:15 IST

संबंधित बातम्या