scorecardresearch

“मी ज्या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती त्याची…”, ‘बिग बॉस’मधील विजेत्या स्पर्धकाने केला धक्कादायक खुलासा

ती नेहमी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमी मनमोकळेपणाने बोलत असते.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ची विजेती म्हणून रुबीना दिलैकला ओळखले जाते. रूबीना दिलैक ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमी मनमोकळेपणाने बोलत असते. रुबीनाने आतापर्यंत सोशल मीडिया आणि विविध मुलाखतींद्वारे स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत. नुकतंच रुबीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

रुबीना दिलैक ही टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लाची पत्नी आहे. त्या दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनव शुक्लाआधी रुबिना ही एका वेगळ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकतंच रुबीनाने तिच्या या जुन्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनव शुक्लाच्या आधी मी ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती त्याच्याबद्दल मला फार भीती वाटत होती, असा खुलासा तिने केला आहे.

रुबीनाने नुकतंच आरजे सिद्धार्थ कन्नन याच्याशी एका कार्यक्रमादरम्यान संवाद साधला. यावेळी तिने तिच्या करिअरव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी रुबीना तिच्या जुन्या नात्याबद्दल बोलताना म्हणाली की, “माझ्या आधीच्या नात्याच्या माझ्या आयुष्यावर इतका परिणाम झाली की मला इतर कोणासोबत डेटवर जाण्यासही भीती वाटत होती. मी इतकी घाबरली होती की माझा प्रेमावरचा विश्वासच काही काळासाठी उडाला होता. त्यावेळी मी एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.”

‘सगळी काळजी घेऊनही…’, चिरंजीवी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह

“जेव्हा एखादा धक्का लागतो तेव्हा तो लागतो. आता बस झालं, यापुढे अजून काहीही नको. झाले ते खूप झाले. विशेष म्हणजे त्यावेळी यावर विश्वास ठेवणे आणखी भयानक होते. मी घाबरली होती. मी फार धाडसाने डेटवर जाण्याचे पाऊल उचलले. त्यावेळी मी म्हणायची नाही बाबा, हे काहीही नको. त्यावेळी मी नक्कीच घाबरली होती. या जुन्या नात्यातून सावरण्यासाठी मला एक वर्ष लागला,” असेही रुबीनाने म्हटले.

याशिवाय रुबीनाने स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत. रुबीना दिलैक ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सलमान खानच्या बिग बॉस सिझन १४ मध्ये झळकली होती. रुबीनाने बिग बॉसमध्ये तिच्या खेळाने आणि रणनीतीने सर्वांचीच मने जिंकली होती. त्या सीझनची ती विजेती होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tv actor and bigg boss 14 winner rubina dilaik says previous relationship with actor left her scarred nrp

ताज्या बातम्या