scorecardresearch

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘शेवंता’ लवकरच झळकणार नव्या रुपात, व्हिडीओ पाहिलात का?

रात्रीस खेळ चाले मालिका सोडल्यानंतर अपूर्वा ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाने मराठी लोकांना खिळवून ठेवलं आहे. जीवनात कितीही टेन्शन, ताण असला तरीदेखील सारं काही ठाराविक काळासाठी विसरायला लावणारा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाने विशेष ओळख निर्माण केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. नुकतंच या कार्यक्रमात ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’च्या भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने हजेरी लावली. नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.

सोनी मराठीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओत अपूर्वा नेमळेकर ही एका वेगळ्या रुपात पाहायला मिळत आहे. यावेळी तिला पाहिल्यानंतर सर्वांची प्रतिक्रिया ही फार वेगळी दिसत आहे. ‘हास्यजत्रेच्या मंचावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर करणार हास्याचा धमाका!पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!गुरु.-शनि., रात्री 9 वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर!’, असे कॅप्शन त्याने याला दिले आहे.

रात्रीस खेळ चाले मालिका सोडल्यानंतर अपूर्वा ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अपूर्वा ‘राणी चेनम्मा’ यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यानंतर आता ती लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मंचावर कॉमेडी करताना दिसणार आहे.

“माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरु होतं…”, सुरांची सांगितिक मैफील असलेला ‘मी वसंतराव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वाने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tv actress apurva nemlekar to be part of maharashtrachi hasya jatra video viral nrp