अतिशय लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच करिश्माने शेअर केलेल्या फोटोमुळे तिचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. करिश्मा बॉयफ्रेंड वरुण बंगेराशी लग्न करणार आहे.
करिश्माचा आज साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करिश्मासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ‘अभिनंदन’ असे लिहिलेला फोटो शेअर केला आहे. करिश्माने शेअर केलेला हा फोटो पाहून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेच्या ‘पांडू’ चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

‘आजतक’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माचा साखरपुडा झाला आहे. साखरपुड्याला काही कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन आहे. करिश्मा आणि वरुणची ओळख एका कॉमन फ्रेंडच्याद्वारे झाली होती. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे बाहेर फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. करिश्मा आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
वरुण पूर्वी करिश्मा पर्ल वी पूरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. आजही करिश्मा आणि पर्ल दोघेही चांगले मित्रमैत्रीण आहेत. त्यानंतर बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर करिश्मा उपेन पटेलला डेट करत होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी लव स्कूल नावाचा रिअॅलिटी शो देखील सुरु केला होता. पण काही कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आता करिश्माचा वरुण बंगेराशी साखरपुडा झाला असून ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.