सध्या सोशल मीडियावर दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात आणि मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये हिंसाचार हा विषय चर्चेत आहे. यावर आता अमेरिकन सुपरमॉडेल, टीव्ही होस्ट आणि लेखिका पद्मा लक्ष्मी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पद्मा लक्ष्मी यांनी भारतातील जातीय तणाव आणि मुस्लिमांवरील हिंसाचार यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.

पद्माने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “भारतात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात होणारा हिंसाचार साजरा केला जात आहे. हे पाहून वाईट वाटले. मुस्लिमविरोधी होत असलेल्या कृत्यामुळे लोकांमध्ये भीती आणि त्यांच्या मनात विष निर्माण होतं आहे. हा प्रपोगॅन्डा धोकादायक आणि निंदनीय आहे”, असे ट्वीट पद्माने केले आहे.

आणखी वाचा : “अमृताला खडूस नेत्रकटाक्ष…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : “पुन्हा लग्न करणार का?” नेटकऱ्याच्या प्रश्नावर करिश्मा कपूरने दिले उत्तर

पुढे पद्माने आणखी एक ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत पद्मा म्हणाली, “हिंदू बांधवांनो, या भीतीला बळी पडू नका. भारतात किंवा इतर कोठेही हिंदू धर्माला धोका नाही. खर्‍या अध्यात्मात कोणत्याही प्रकारच्या द्वेशाला जागा नसते. या प्राचीन भूमीत सर्व धर्माच्या लोकांना शांततेने एकत्र राहता आले पाहिजे.”

आणखी वाचा : अमृता- प्राजक्तामध्ये सवाल जवाबाची जुगलबंदी, ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील नव्या लावणीची झलक

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

दरम्यान, हनुमान जयंतीच्या निमित्ताने एप्रिलच्या सुरुवातीला जाळपोळ आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये ८ पोलिसांसह एक स्थानिक रहिवासी जखमी झाला होता. जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही रामनवमीच्या मिरवणुकीत मोठा गोंधळ झाला होता.