अस्सं माहेर नको गं बाईमध्ये समीर चौघुलेची एण्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

‘या दिवशी मालिकेत होणार समीर चौघुलेची एण्ट्री

छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली ‘अस्सं माहेर नको गं बाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष गाजताना दिसत आहे. माहेरी असूनदेखील सखीला माहेरपणाचा अनुभव घेता येत नसल्यामुळे ती पुरती कंटाळली आहे. तर आई-बाबा जावयाचे लाड करण्यात जराही कुचराई करताना दिसत नाही.त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस मज्जेशीर आणि रंगतदार वळण घेत असल्याचं दिसून येतं. त्यातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एण्ट्री होणार आहे.

समीर चौघुले हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. उत्तम अभिनयशैली आणि विनोदशैलीमुळे समीर चौघुलेचं नाव आज महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची आहे. विशेष म्हणजे हा लोकप्रिय अभिनेता लवकरच अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेत झळकणार आहे.

या नव्या मालिकेत समीर चौघुले गंडावरे बाबा ही भूमिका साकारणार आहे. लवकरच उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचं आगमन होणार आहे. सखीची आई अनसुया ही गंडावरे बाबांची मोठी भक्त आहे. कायम त्यांच्या बोलण्यात गंडावरे बाबांचा उल्लेख असतो. या नव्या भूमिकेतदेखील समीर त्याच्या विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. येत्या १४ तारखेला गंडावरे बाबांची मालिकेत एण्ट्री होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tv show assa maher nko g bai actor sameer chaugule as gandavarebaba ssj