गेली १२ वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. आता तिच्या भूमिकेत अभिनेत्री सुनैना फौजदार दिसणार आहे. पण ही भूमिका साकाराताना तिला एका गोष्टीची भीती वाटत असल्याचे तिने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
नुकतीच सुनैनाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या भूमिकेविषयी वक्तव्य केले आहे. ‘मला अजूनही विश्वास बसत नाही की मी तारक मेहता मालिकेत काम करणार आहे. चाहत्यांना मी अंजली भाभीच्या भूमिकेत आवडेल की नाही याची मला जास्त भीती वाटते. पहिले अंजलीची भूमिका साकारणारी नेहा मेहता १२ वर्षे मालिकाचा भाग होती. मी भूमिकेत दिसणार असल्याचे कळताच अनेकांनी मला मेसेज आणि फोन करत शुभेच्छा दिल्या’ असे ती म्हणाली.
पाहा : ‘तारक मेहता..’मध्ये ही ग्लॅमरस अभिनेत्री साकारणार अंजली भाभी, पाहा फोटो
तसेच मालिकेतील पहिला दिवस तिच्यासाठी करिअरच्या सुरुवातीला पहिल्या मालिकेत काम केल्यासारखा होता. सेटवर असित सर आणि प्रोडक्शन हाउसने माझ्यावर कोणत्या प्रकारचा दबाव टाकला नाही. त्यांनी माझे स्वागत केले. शैलेश यांनी मला पाठिंबा दिला. मला पहिला सीन त्यांच्यासोबतच शूट झाला असे सुनैना म्हणाली.
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. त्यामुळे मी माझे १०० टक्के देऊन काम करेन आणि प्रेक्षकांना मी अंजली भाभीच्या भूमिकेत आवडेल अशी आशा करते असे सुनैना पुढे म्हणाली आहे.
