बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्नाची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी देखील अक्षय नेहमीच ट्विंकलला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ट्विंकल बऱ्याचवेळा अक्षयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. यावेळी देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ट्विंकलने निळ्या रंगाचं स्वेटशर्ट परिधान केलं आहे. तर अक्षयने काळ्या रंगाच जॅकेट परिधान केलं आहे. हे फोटो कॅन्डिड फोटो असल्याचं ट्विंकलने सांगितले आहेत. तर हे फोटो ट्विंकलच्या भाचीने क्लिक केल्याचे देखील ट्विंकलने सांगितले आहे. हे फोटो शेअर करत “आम्ही एकमेकांशी बोलत असताना माझ्या भाचीने हे फोटो क्लिक केले. मला वाटते की या फोटोतून लग्नाची कहाणी दिसते. आपण हसत बोलणं सुरु करतो. त्यानंतर शेवटच्या फोटोत मी त्याला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याऐवजी माझा कॉफीला धक्का लागतो! जब वी मेट ते व्हॉट द हेक!”, असे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे.

pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar first engagement video viral
Video: जबरदस्त डान्स अन् बरंच काही…; ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा ‘असा’ पार पडला साखरपुडा, पाहा पहिला व्हिडीओ
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा

आणखी वाचा : ‘तुम्ही तुमच्या पत्नीवर लक्ष द्या’, जिनिलियावर लक्ष ठेव सांगणाऱ्या ट्रोलरला रितेशचे सडेतोड उत्तर

आणखी वाचा : ‘फॅमिली मॅन २’मध्ये समांथाची भूमिका पाहून शाहिदने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

काही दिवसांपूर्वी अक्षय आणि ट्विंकलने मुलगी निताराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिला ९व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी हे फोटो शेअर केले होते. ते दोघे निताराचे फोटो शेअर करताना तिचा चेहरा दिसत नसेल असे फोटो शेअर करतात.