दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २३७ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सर्वत्र सध्या या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. नुकतंच अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. यावेळी तिने या चित्रपटाची खिल्लीही उडवली आहे.

ट्विंकल खन्ना हिने नुकतंच टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका कॉलममध्ये याबाबत भाष्य केले. यावेळी ट्विंकल खन्नाने विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सवर प्रतिक्रिया देताना त्याची खिल्ली उडवली. यावेळी ट्विंकल खन्ना म्हणाली, “सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींसोबत बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे. तसेच या चित्रपटाची नावे रजिस्टर करण्यासाठी या निर्मांत्यांचीही धावपळही सुरु आहे.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
Tejashwi Prasad Yadav eating fish
नवरात्रीच्या काळात मासे खाल्ल्यामुळे तेजस्वी यादव ट्रोल; भाजपा नेते म्हणतात, “हंगामी सनातनी…”
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

“सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्माते ‘साऊथ बॉम्बे फाइल्स’, ‘अंधेरी फाइल्स’ यासारखे चित्रपट बनवण्याचा आणि त्याचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना ‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे यशाची चव चाखायची आहे”, असेही ती म्हणाली.

“काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध निर्मात्याने बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान मला माहिती मिळाली की ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर आता त्या चित्रपटाच्या नावाप्रमाणे इतर चित्रपटांच्या नावांचा पूर आला आहे. सध्या अनेक चित्रपटांच्या टायटलची नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक मोठमोठ्या शहरांवर आधीच हक्क सांगितला जात आहे. त्यामुळे आता अनेक लोक ‘अंधेरी फाइल्स’, ‘खार-दांडा फाइल्स’ आणि ‘साऊथ बॉम्बे फाइल्स’ अशी नावे नोंदवत आहेत. मात्र या सर्वांमुळे मी असा विचार करतेय की माझे सहकारी अजूनही स्वत:ला चित्रपट निर्माते कसे काय म्हणवून घेऊ शकतात?” असेही ट्विंकल खन्ना म्हणाली.

“It’s a…”, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी आला छोटा पाहुणा

“मी सुद्धा आता ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे”, असेही म्हणत ट्विंकलने अप्रत्यक्षपणे द कश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली. तसेच याबाबत मी माझी आई डिंपल कपाडियालाही सांगितले असेही तिने म्हटले.