उदयनराजे भोसलेंना लागली ‘भिरकीट’ची भुरळ, कौतुक करत म्हणाले…

‘भिरकीट’ या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील सगळे विनोदवीर पाहायला मिळत आहेत.

Udayanraje Bhosale marathi movie bhirkit
'भिरकीट' या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील सगळे विनोदवीर पाहायला मिळत आहेत.

हसताहसता मनाला स्पर्श करून जाणारा चित्रपट म्हणजे ‘भिरकीट’. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील सगळे विनोदवीर आहेत. त्यामुळे हा एक धमाल चित्रपट बनला आहे. मनोरंजनासोबतच एक खूपच महत्वाचा संदेश देणाऱ्या अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ला समीक्षकांसह प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली असून आता यात आणखी एक मोठे नाव सामील झाले आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या काही निकटवर्तीयांसह ‘भिरकीट’ हा चित्रपट नुकताच साताऱ्यात पाहिला. उदयनराजे यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

केवळ कौतुक नाही तर प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा आणि याकरता साताऱ्यातील चित्रपटगृहात या चित्रपटाचे शो काही दिवस अजून ठेवावेत, असे आवाहनही यावेळी केले आहे. चित्रपटाबद्दल उदयनराजे भोसले म्हणतात, माझ्या काही परिचयाच्या लोकांनी ‘भिरकीट’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्याकडून आलेल्या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकून चित्रपट पाहण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. नुकताच हा चित्रपट पाहिला असून खूपच सुंदर अशी या चित्रपटाची बांधणी केली आहे.”

आणखी वाचा : “तुला जी मदत लागेल हवी ती मदत मी…”, मंगेश देसाईंनी सांगितला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पडद्यामागचा एकनाथ शिंदेंसोबतचा ‘तो’ किस्सा

पाहा फोटो

‘भिरकीट’ या चित्रपटात चित्रपटसृष्टीतील सगळे विनोदवीर पाहायला मिळत आहेत. (Photo Credit : PR)

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

पुढे उदयनराजे म्हणाले, “भिरकीट मधील प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या आसपास वावरत असते, हे चित्रपट पाहताना प्रकर्षाने जाणवते. काळासोबत पुढे जाताना माणूस माणुसकी मागे सोडत आहे, हेच खूप उत्तमरित्या यात मांडले आहे. माणुसकी जपण्यासाठी, नाते जपण्यासाठी, प्रेक्षकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Udayanraje bhosale loved the marathi movie bhirkit dcp

Next Story
DID Super Moms : ७६ वर्षीय मराठमोळ्या आजींचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी