गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल वृत्तांमागचं सत्य | udit narayan heart attack news viral manager gave information about singer health update | Loksatta

गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल वृत्तांमागचं सत्य

उदित नारायण यांच्या मॅनेजरने त्यांच्या हेल्थबाबतची माहिती दिली आहे.

गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल वृत्तांमागचं सत्य
उदित नारायण यांच्या मॅनेजरने याबाबतची माहिती दिली आहे.

प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची वृत्तं सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. ज्यामुळे उदित नारायण यांचे चाहते हैराण झाले आहेत. ट्विटरवरही अशा आशयाचे मेसेज व्हायरल होताना दिसत होते. त्यामुळे चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. नेमकं सत्य काय? उदित नारायण यांची तब्येत खरंच बिघडली का? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. पण आता या व्हायरल मेसेज आणि वृत्तांमागचं सत्य समोर आलं आहे. उदित नारायण यांच्या मॅनेजरने याबाबतची माहिती दिली आहे.

उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याची माहिती समोर आली आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, उदित नारायण यांच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया देत ही सर्व वृत्तं खोटी असल्याची माहिती दिली आहे. उदित नारायण यांची तब्येत ठीक आहे आणि त्यांना काहीही झालेलं नाही असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आहे. ट्विटरवर अशा प्रकारचे मेसेज आणि वृत्त व्हायरल झाल्यानंतर आपलं त्यांच्याशी बोलणं झालं असून तेसुद्धा या अशा वृत्तांमुळे त्रासले आहेत असं त्यांच्या मॅनेजरने सांगितलं आहे.

आणखी वाचा- “किती आल्या आणि किती गेल्या”; उदित नारायण यांचा कुमार सानू यांना टोला

दरम्यान काही तासांपूर्वीच उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची वृत्तं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली होती. नंतर या सर्व अफवा असल्याची माहिती समोर आली. अर्थात या अफवा कोणी पसरवल्या याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण यामुळे उदित नारायण यांचे चाहते मात्र खूप हैराण झाले. आता त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार उदित नारायण ठीक असून त्यांना काहीही झालं नसल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दुर्गा पूजेदरम्यान अचानक कतरिना आली समोर अन् तो…, ‘त्या’ कृतीमुळे रणबीर कपूर झाला ट्रोल

संबंधित बातम्या

“सतत एकेरी उल्लेख करतोय कारण…” विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षे यांचं ट्वीट चर्चेत
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
विक्रम गोखले यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे मिळालं मुंबईत घर, स्वत:च सांगितलेला किस्सा
“समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय?” शरद पोंक्षे म्हणतात…
विक्रम गोखले यांना ‘या’ चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार; Video बघून डोळ्यात येईल पाणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : राज्यातील पर्यटन वाढेल?
मराठा आरक्षणासंदर्भातील फेरविचार याचिका रखडली; तांत्रिक बाबींमुळे संभ्रम
म्हशीच्या मांस निर्यातीत भारत जगात चौथा; इजिप्तला सर्वाधिक निर्यात
अन्न व औषध प्रशासनातील ५० टक्के पदे रिक्त!; प्रतिनियुक्तीचा आयुक्तांचा प्रस्ताव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी