scorecardresearch

युक्रेनमधील सध्याच्या युद्धभूमीवर झालंय ‘RRR’च्या हिट गाण्याचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल

राजामौली यांच्या बहुचर्चित ‘RRR’ चित्रपटातील हे लोकेशन आता युक्रेनमधील युद्धाचं ठिकाण झालंय.

ss rajamouli, rrr film, Ukraine Russia war, Ram Charan Teja, Jr NTR, Naatu Naatu song, एस एस राजामौली, युक्रेन रशिया युद्ध, आरआरआर फिल्म, राम चरण तेजा, नाटू नाटू सॉन्ग, युक्रेन युद्ध
एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या काही शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियानं युक्रेनवर हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढता तणाव पाहता जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू असून संपूर्ण जग शांततेसाठी प्रार्थना करत आहे. अशात सध्या एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाच्या काही शूटिंगचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

युक्रेन हा भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी आवडता शूटिंग स्पॉट राहिला आहे. या ठिकाणी बऱ्याच भारतीय चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. मागच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये या ठिकाणी एस एस राजामौली यांचा चित्रपट RRR मधील एका गाण्याचं शूटिंग झालं होतं. राजामौली यांच्या चित्रपटात राम चरण तेजा आणि ज्युनिअर एनटीआर यांच लोकप्रिय गाणं ‘नाटू नाटू’ युक्रेनमध्येच चित्रित करण्यात आलं आहे.

चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना टीमनं सोशल मीडियावर या लोकेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. शूटिंगच्या वेळी ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांच्यासह संपूर्ण टीम २ आठवड्यांसाठी युक्रेनमध्ये राहिली होती. या व्यतिरिक्त भारत आणि बल्गारियामध्येही या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. जवळपास ४०० कोटींचं बजेट असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

‘RRR’ चित्रपटाची कथा दोन स्वतंत्र सैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामा राजू यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर यांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन एस एस राजामौली यांचं असून हा चित्रपट येत्या २५ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-02-2022 at 14:28 IST
ताज्या बातम्या