scorecardresearch

युक्रेनियन अभिनेत्रीने पाठीवर काढलेलं पंतप्रधान मोदींचं चित्र, पाहा फोटो

सध्या या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक युक्रेनियन अभिनेत्री चर्चेत आहे. या चर्चा अभिनेत्रीने पाठिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र काढल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

या अभिनेत्रीचे नाव नतालिया कोझीनोवा आहे. तिने हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ती मूळची युक्रेनची असून तिच्याकडे युक्रेनचं नागरिकत्व आहे. सध्या नतालिया तिच्या अंगावर काढलेल्या चित्रामुळे चर्चेत आहे. २०१५ साली पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचे चित्र पाठीवर काढल्यामुळे नतालिया चर्चेचा विषय ठरली होती. भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारत असल्याचा आनंद तिने हे चित्राद्वारे व्यक्त केले होते.

२०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अतिथी तुम कब जाओगे’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नतालिया पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. त्यासोबतच तिने ‘अंजुना बीच’, ‘लव्ह वर्सेस गँगस्टर’, ‘तेरे जिस्म से जान तक’ या चित्रपटात काम केले आहे. अल्ट बालाजीवरील ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये नतालिया बोल्ड सीन देताना दिसली होती. लवकरच ती ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukrainian actress nataliya kozhenova has got modis tattooed on her back avb

ताज्या बातम्या