scorecardresearch

Premium

‘हिरा फेरी’ अल्ट्रा झकास वर

‘‘अल्ट्रा झकास हे दर्जेदार आणि अखंड मनोरंजन देणारे ओटीटी माध्यम आम्ही नुकतेच लाँच केले आहे.

ultra
‘हिरा फेरी’ अल्ट्रा झकास वर (फोटो सौजन्य:फेसबूक )

मनोरंजन विश्वात १९८२ सालापासून असलेल्या ‘अल्ट्रा मीडिया अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेट’च्या अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘ढ लेकाचा’, ‘अदृश्य’, ‘बोल हरी बोल’ या चित्रपटांनंतर अमोल बिडकर दिग्दर्शित ‘हिरा फेरी’ हा नवा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात अभिनय सावंत, शुभांगी तांबळे, विजय पटवर्धन, दिगंबर नाईक, प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे अशी कलाकार मंडळी आहेत.

या चित्रपटात रातोरात श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या आळशी घरजावयाची कथा मांडण्यात आली आहे. एका चोराला आपल्या जाळय़ात अडकवून त्याने चोरलेला हिरा हडपण्याच्या प्रयत्नांत असलेला आळशी घरजावई, त्याच वेळी तिथे पत्नीचे वडील, पोलीस अशा अनेक व्यक्ती एकामागोमाग एक दाखल होतात आणि एकच गोंधळ उडतो. आता नेमका हिरा कोणाला मिळणार? याची उत्तरं चित्रपटात मिळणार आहेत.

actor vidyut jamwal
परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी
tharla tar mag serial new promo
सायलीचा जीव अर्जुन कसा वाचवणार? जुई गडकरीने शेअर केला ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो
Vaibhav Tattvadi celebrated his birthday
Video औक्षण, केक, मिठाई अन्..; वैभव तत्तवादीने खास मित्रांबरोबर साजरा केला वाढदिवस, पाहा सेलिब्रेशनचा व्हिडिओ
Uma-tips-for-pimple-free-skin
चेहरा नितळ आणि पिंपल फ्री कसा ठेवायचा? सोप्या घरगुती टिप्स देत लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणाली…

‘‘अल्ट्रा झकास हे दर्जेदार आणि अखंड मनोरंजन देणारे ओटीटी माध्यम आम्ही नुकतेच लाँच केले आहे. या ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. यावेळी आम्ही ‘हिरा फेरी’ हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करीत आहोत. या चित्रपटाला सर्व रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम देतील अशी आशा आहे,’’असे चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले. ‘‘‘बोल हरी बोल’ या चित्रपटाचे काम सुरू असतानाच आमच्यासमोर सुशीलकुमार अग्रवाल यांनी ही पटकथा ठेवली. ओटीटी म्हटलं की गूढ, गुन्हेगारी, शिवीगाळ असे प्रकार जास्त पाहायला मिळतात. पण ‘हिरा फेरी’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा विनोदी चित्रपट आहे. जो संपूर्ण परिवार एकत्र पाहू शकतो,’’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल बिडकर यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ultra media and entertainment ultra zakas marathi ott hira pheri movie amy

First published on: 27-08-2023 at 02:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×