Umesh Kamat On Fight With Priya Bapat : प्रिया बापट आणि उमेश कामत हे कपल मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांचं आवडतं कपल आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून या कपलने अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र केले आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच, दोघांना एकत्र पडद्यावर पाहायलाही प्रेक्षकांना खूप आवडतं.

उमेश कामत आणि प्रिया बापटचं लग्न २०११ मध्ये दसऱ्याच्या दिवशी झालं. त्यापूर्वी अनेक वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात दोघांनी आपलं नात लपवून ठेवलेलं. दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. एकमेकांबरोबरचे फोटो-व्हिडिओ शेअर करीत असतात.

प्रिया-उमेश दोघे त्यांच्या नात्याबद्दल विविध मुलाखतींमधून व्यक्त होत असतात. अशातच उमेशने प्रियाबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. उमेशने नुकताच चाहत्यांशी संवाद साधला. इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला प्रियाबरोबर कशावरून भांडण होतं, याबद्दल विचारलं.

Award Banner

या प्रश्नाचं मजेशीर उत्तर देत उमेश म्हणाला, “प्लीज असे काही प्रश्नं विचारू नका, ज्याची एका वाक्यात उत्तरं देता येत नाहीत. ज्या प्रश्नांची उत्तरं एका वाक्यातच देता येतील, असेच प्रश्नं विचारा. प्रिया आणि माझं खूप विषयांवर भांडण होतं. मला त्यासाठी एक निबंध लिहावा लागेल. फक्त भांडणावरच्या प्रश्नासाठी विशेष आस्क मी सेशन करावं लागेल. आमच्यात गोड भांडणं होतात. ती मिटतातही. नंतर आम्ही छान हसत आनंदाने आयुष्य जगतो.”

प्रिया बापटबरोबरच्या भांडणाबद्दल उमेश कामत म्हणाला…

प्रिया-उमेश हे विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या ते ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लवकरच त्यांचा एकत्र प्रोजेक्टसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.