‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं मत मांडते. उर्फीने काही काळापूर्वी लग्नाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम
उर्फी एका पारंपारिक मुस्लिम कुटुंबातील आहे, परंतु मुस्लिम असूनही तिला स्वतः मुस्लिम मुलाशी लग्न करायचे नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने हा खुलासा केला होता.
आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट
उर्फीने इंडिया टूडेला मुलाखत दिली होती, ‘या मुलाखतीमध्ये लग्नाविषयी बोलताना ती म्हणाली की, ‘मी एक मुस्लिम मुलगी आहे. माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट करणारे हे अर्धे मुस्लिम लोक असतात. त्यांना असे वाटते की मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे. त्यांना माझा प्रचंड राग येतो कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या घरातील महिलांनी एका विशिष्ट प्रकारे व्यवहार करावा, असे वाटते. ते समाजातील सर्व महिलांना नियंत्रित करु इच्छितात. त्यामुळे मी इस्लामला मानत नाही.’
उर्फी पुढे म्हणाली, ‘मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला ज्या व्यक्तीशी लग्न करायचे त्याच्याशी मी लग्न करेन.’ पुढे या विषयी सांगताना उर्फी म्हणाली होती की, सध्या ती भगवद् गीता वाचत आहे. तिला फक्त त्या (हिंदू) धर्माविषयी जाणून घेऊ इच्छिते.
आणखी वाचा : राज ठाकरे राहत असलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थाचे, फोटो पाहा
उर्फीने सांगितले की, ‘माझे वडील खूप परंपरावादी होते. मी १७ वर्षांची होते तेव्हा ते मला आणि माझ्या भावंडांना आमच्या आईकडे सोडून गेले. माझी आई खूप धार्मिक स्त्री आहे, पण तिने कधीच आपला धर्म आमच्यावर लादला नाही. माझे भाऊ आणि बहिणी इस्लामचे पालन करतात आणि मी करत नाही, परंतु त्यांनी कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. तुम्ही तुमचा धर्म तुमच्या पत्नी आणि मुलांवर लादू शकत नाही. ते हृदयातून आले पाहिजे, अन्यथा तुम्ही किंवा अल्लाह यावर प्रसन्न होणार नाही.’