“मला चांगले मानधन मिळत होते पण…”, ‘द कपिल शर्मा शो’ मधील पिंकी बुआने केला खुलासा

“मला तीच तीच व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला होता.”

upasana-singh-
उपासना सिंग

‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. या शोचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. यातील अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमधून पिंकी बुआ या व्यक्तिरेखेने नावारुपाला आलेली उपासना सिंग हिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली. नुकतंच तिने यामागचे कारण सांगितले आहे.

पिंकी बुआ अशा नावाने प्रसिद्ध असलेली उपासना सिंग हिने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला द कपिल शर्मा शो मधून योग्य ते मानधन मिळत होतं. पण काही केल्या समाधान मिळत नव्हते आणि माझ्यासाठी पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे आहे. मला तीच तीच व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला होता. मला त्यात काहीही मजा येत नव्हती.”

राजपाल यादववर २० लाखांच्या फसवणुकीचा आरोप, १५ दिवसात पोलिसात हजर राहण्याचे आदेश

“मी अनेकदा याबद्दल निर्मात्याला सांगितले होते. मला असे पात्र साकारायचे होते जे माझ्याव्यतिरिक्त कोणीही साकारु शकत नाही. मी अडीच वर्ष कपिलचा शो केला. मला चांगले पैसे मिळत होते. पण मी कपिलला सांगितले होते की मला इथे काही नवीन पात्र साकारायला मिळत नाही. मला काहीतरी वेगळं करायला द्या. यात काहीही मजा नाही. या शोमधून बाहेर पडताना मी कपिलला सांगितले होती की, जेव्हा माझ्यासाठी काहीतरी चांगले पात्र असेल तेव्हाच मला या शोसाठी बोलवा”, असे उपासना सिंग म्हणाली.

दरम्यान उपासना सिंग हिची मासूम ही वेबसीरिज नुकतंच प्रदर्शित झाली. यात बोमन इराणी आणि समा तिजोरी मुख्य भूमिकेत आहेत. त्यासोबत उपासना सिंगची व्यक्तिरेखाही यात खूप महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या या भूमिकेच सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upasana singh reveals why she quit kapil sharma show gives update on their equation nrp

Next Story
सोनाली कुलकर्णी झाली गायिका! ‘तमाशा लाईव्ह’चं नवं गाणं ‘कडक लक्ष्मी’ प्रेक्षकांच्या भेटीला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी