scorecardresearch

Premium

उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त

प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. एस. क्रिएशन्सच्या ‘रोप’ या आगामी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. पुण्यातील दगडुशेठ गणपती मंदिरात एका भव्य सोहळय़ात हा मुहूर्त करण्यात आला.

upendra limaye new movie
उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त

प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. एस. क्रिएशन्सच्या ‘रोप’ या आगामी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. पुण्यातील दगडुशेठ गणपती मंदिरात एका भव्य सोहळय़ात हा मुहूर्त करण्यात आला. एक चांगली कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याच्या उद्देशाने ‘रोप’ची निर्मिती करण्यात आली आहे, अशी भावना चित्रपटाचे निर्माते साईनागराज आणि श्रुजना यांनी व्यक्त केली. चित्रपटाचे दिग्दर्शन सूर्या यांचे असून कपिल जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत. ‘रोप’ हा एक सशक्त कथानक, श्रवणीय संगीत आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असेल, असे दिग्दर्शक सूर्या यांनी स्पष्ट केले. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

चित्रपटाच्या मुहूर्त सोहळय़ाला निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासह चित्रपटाचा चमू श्रुती शेट्टी, कपिल गुडसूरकर, ऋषभ मोरे, बालकलाकार धृती या कलाकारांसह प्रॉडक्शन डिझायनर नेरंगलवार राज गौड, प्रॉडक्शन मॅनेजर बाबासाहेब पाटील, कथालेखक बी. सुदर्शन, संवादलेखक संजय नवगिरे, संगीत दिग्दर्शक राजवीर गांगजी, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे, धनंजय साबळे, सहदिग्दर्शक आशीष पवार, महेंद्र गाजभरे, वेशभूषाकार अर्चना बुक्कावार, गीतकार मंदार चोळकर, पब्लिसिटी डिझायनर जय कुंभारे आणि चित्रपट क्षेत्रातील इतर नामवंत मंडळी उपस्थित होती.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
hoarding against bjp mla ganpat gaikwad in kalyan east
कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन
Prabhavalkar Rohini Hattangadi
अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upendra limaye film rope is a grand occasion ysh

First published on: 17-09-2023 at 03:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×