Video : उर्फी जावेदचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद, असा ड्रेस परिधान करत स्वतःच म्हणाली, “तो कोण आहे ज्याने…”

उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, उर्फीला नेटकऱ्यांनी सुनावलं

urfi javed instagram urfi javed
उर्फी जावेदचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, उर्फीला नेटकऱ्यांनी सुनावलं

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील शाब्दिक युद्ध तर बरेच दिवस चर्चेत राहिलं. पण उर्फीने मात्र या सगळ्या प्रकरणात माघार घेतली नाही. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र उर्फीने तिची स्टाइल काही सोडली नाही. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर

उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये उर्फीची विचित्र फॅशन पाहायला मिळत आहे. उर्फीने ब्रालेट टॉप परिधान केला असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायल मिळत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून तिला अनेकांनी ट्रोल करण्यासही सुरुवात केली. “तो कोण आहे ज्याने मला वळूनही पाहिलं नाही.” असंही उर्फीने म्हटलं आहे.

दरम्यान उर्फी जेव्हा हा ड्रेस परिधान करुन घराबाहेर पडली तेव्हा तिला पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी उर्फी फोटोसाठी पोझ देत होती. यावेळी तिच्याबरोबरच्याच एक मुलगी उर्फीसाठी कोट घेऊन येते. उर्फीला तो कोट परिधान करण्यासाठी ती देते. पण उर्फी त्या मुलीचं हे कृत्य पाहून तिच्याकडे रागाने बघते.

आणखी वाचा – Video : “वाईट आवाज आणि…” नवीन गाणं प्रदर्शित होताच अमृता फडणवीस ट्रोल, नेटकऱ्यांनी गाणी न गाण्याचा दिला सल्ला

उर्फीची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. उर्फीला त्या मुलीचं वागणं आवडलं नाही. त्यामुळे तिचा राग अनावर झाला. यावरुनही आता उर्फीला ट्रोल करण्यात येत आहे. तू तुझ्याबरोबर काम करणाऱ्यांचा आदर केला पाहिजे असं नेटकरी उर्फीला म्हणत आहेत. तसेच तू केलेली फॅशन अत्यंत वाईट आहे असंही अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:58 IST
Next Story
“पठाणमधील काकाही…” ५ वर्षाच्या चिमुरडीचे प्रेम पाहून शाहरुख खान भारावला, कमेंट चर्चेत
Exit mobile version