scorecardresearch

Video : “तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची…” फोटोग्राफर्सवर भडकली उर्फी जावेद

उर्फी जावेदचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Video : “तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची…” फोटोग्राफर्सवर भडकली उर्फी जावेद
नेहमीच कूल असणारी उर्फी यावेळी फोटोग्राफर्सवरच संतापली.

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद अनेकदा विचित्र फॅशनचे कपडे घालून फोटोग्राफर्ससमोर पोज देताना दिसते. सोशल मीडियावर अनेकदा त्याचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काहीजण तिच्या ड्रेस आणि लूकवर अश्लील कमेंट करतात तर काही तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करताना दिसतात. केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी उर्फी अशाप्रकारचे कपडे घालते आणि फोटो काढण्यासाठी जागोजागी फोटोग्राफर्सना बोलावते असंही काही लोकांचं म्हणणं आहे. पण यावेळी उर्फीचं वेगळे रूप पाहायला मिळालं. शांत आणि मजेदार स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीचा संताप फोटोग्राफर्सना पाहायला मिळाला. नेहमीच कूल असणारी उर्फी यावेळी फोटोग्राफर्सवरच संतापली.

सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एका व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात उर्फी जावेद फोटोग्राफर्सवर चिडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद फोटोग्राफर्सना विचारतेय, ‘मागच्या वेळी जेव्हा मी ‘झलक’साठी आले होते तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी कमेंट केली होती की, आज व्यवस्थित कपडे घालून आली आहे.’ यानंतर उर्फी त्या व्यक्तीचा ऑडिओ सर्वांना ऐकवते आणि रागाने विचारते की, ‘हा आवाज कोणाचा आहे?’
आणखी वाचा- हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी खास संधी, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने केली घोषणा

उर्फी जावेद एवढ्यावरच थांबत नाही. ती पुढे म्हणते, “मी यासाठी इथे येत नाही. कृपया तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची असेल तर तुमच्या मैत्रिणीच्या आणि आई-बहिणीच्या घरी जाऊन करा, आजनंतर माझ्या कपड्यांवर कोणी कमेंट करणार नाही. मी तुमचा खूप आदर करते आणि त्या बदल्यात मला हे असं सर्व मिळत आहे.”

आणखी वाचा-सेक्सबद्दल प्रश्न विचारणाऱ्या युजरवर भडकली उर्फी जावेद, म्हणाली…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने ‘झलक दिखला जा १०’ या डान्स रिअलिटी शोच्या लॉन्च पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी ती निळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये एक फोटोग्राफर बोलत आहे की, ‘आज ती व्यवस्थित कपडे घालून आली आहे.’ याच व्हिडीओवर आता उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urfi javed angry reaction on photographers comment about her outfits mrj

ताज्या बातम्या