scorecardresearch

“लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुमच्यासारखे राजकारणी…” चित्रा वाघ यांच्या टीकेला उर्फी जावेदचं प्रत्युत्तर

उर्फी जावेद चित्रा वाघ यांना उद्देशून नेमकं काय म्हणाली आहे? वाचा सविस्तर बातमी

“लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुमच्यासारखे राजकारणी…” चित्रा वाघ यांच्या टीकेला उर्फी जावेदचं प्रत्युत्तर
Urfi Javed Answer via tweet to BJP Leader Chitra Wagh and Said So sad to see politicians today

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद ही तिच्या विविध लुक्ससाठी चर्चेत असते. तिची फॅशन स्टाईल विचित्र असते त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फीच्या कपड्यांवरून तिला आत्तापर्यंत खूपवेळा ट्रोल करण्यात आलं आहे.अशात आज सकाळीच उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं. त्यानंतर चित्रा वाघ यांच्या ट्विटला उर्फीनेही प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी काय म्हटलं आहे ट्विटरवर?

शी..SS अरे हे काय चाललं आहे मुंबईत. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/ मुली विकृतांच्या शिकार होत आहेत आणि ही बया अजून विकृती पसरवते आहे. असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने उत्तान कपडे घातले आहेत. मात्र या ट्विटला उर्फी जावेदने रोखठोक उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा” चित्रा वाघ यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, म्हणाल्या “चार भिंतीच्या आड…”

आणखी वाचा – “तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी

काय म्हटलं आहे उर्फी जावेदने?

तुमच्यासारख्या राजकारण्यांना पाहून फारच वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करत आहात. बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं फार सोयीचं आहे. बेरोजगारी, लाखो बलात्कार झाल्याची प्रलंबित प्रकरणं, खुनांची अनेक प्रकरणं आणि अनेक समस्या आहेत त्यांचं काय? तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काहीच का करत नाही? महिलांचं शिक्षण, त्यांचा विकास याकडे तुम्ही लक्ष का देत नाही? अशा प्रश्नांची मालिकाच उपस्थित करत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींना ट्रोल करण्यासाठी भाजपाकडून उर्फी जावेदच्या नावाचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी गुजरातमधील एका भाजपा कार्यकर्त्याने एक ट्वीट केले होते. या ट्वीटमुळे उर्फी चांगलीच भडकली होती. या ट्वीटवर तिनं आक्रमक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले होते. तसेच, आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला होता. उर्फीच्या या भूमिकेनंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतात. आज भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यादेखील उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली. मात्र उर्फीने चित्रा वाघ यांना रोखठोक उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 20:23 IST

संबंधित बातम्या