scorecardresearch

Premium

‘असे छोटे कपडे घालायला मला…’ अतरंगी फॅशनवर उर्फी जावेदची बोल्ड कमेंट

आपल्या अतरंगी फॅशनमुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते.

urfi javed, urfi javed instagram, urfi javed fashion, urfi javed video, उर्फी जावेद, उर्फी जावेद इन्स्टाग्राम, उर्फी जावेद ड्रेस, बॉलिवूड न्यूज, मराठी बातम्या
आपल्या ड्रेसमुळे उर्फीला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या ड्रेसमुळे उर्फीला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. उर्फी जेवढी बिनधास्त आहे तेवढीच बोल्डही आहे. रविवारी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टवर उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिच्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती काळ्या रंगाच्या लेस बॉडीसूटमध्ये दिसली. पण मजेदार गोष्ट अशी की पॅपराजींशी बोलताना तिने स्वतःच्या अतरंगी फॅशनवर बोल्ड कमेंट केली.

उर्फी जावेदचा स्वतःचं एक वेगळं स्टाइल स्टेटमेंट आहे. अलिकडेच जेव्हा ती एअरपोर्टवर स्पॉट झाली त्यावेळी तिने काळ्या रंगाचा बॉडीसूट, डेनिम आणि प्लॅटफॉर्म हिल्स अशा लूकमध्ये दिसली. सोशल मीडियावर तिच्या या लुकची बरीच चर्चा झाली. उर्फी तिचं आउटडोअर शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतली होती. यावेळी ती फोटोग्राफर्सशी बोलताना दिसली. यावेळी तिने फोटोग्राफर्सना मिठाई देखील वाटली.

ashok saraf
Video “पाहुण्यांना बसायला सांगायची पद्धत नाही का?” मराठी अभिनेत्याला दिलेल्या वागणुकीवरुन अशोक सराफांवर नेटकरी नाराज
When the owner dresses up like the dog's favorite teddy
हृदयस्पर्शी! मालकाने दिलं अनोखं सरप्राईज, आवडत्या टेडीसारखी कपडे घालून येताच कुत्र्याचा आनंद गगनात मावेना, VIDEO पाहाच
father and son reactions win internet after buying second hand bicycle ias shared emotional video viral
आनंदाला मोल नाही! वडिलांनी सेकंड हँड सायकल आणताच आनंदाने नाचू लागला चिमुकला; ह्रदयस्पर्शी Video वर युजर्स म्हणाले…
mrunal divekar
“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

एअरपोर्टवरून निघताना आपल्या टीमसोबत बाहेर पडताना उर्फी म्हणाली, ‘मी खूप थकले आहे. मागच्या तीन दिवसांपासून सातत्यानं शूटिंग करत होते. माझ्या चेहऱ्यावर आता थकवा दिसून येत आहे. मला थंडीत शूटिंग करणं अजिबात आवडत नाही. मला असे छोटे कपडे घालायला आवडतात.’ एवढी बोलून उर्फी जोरजोरात हसू लागली.

दरम्यान उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल व्हावं लागतं मात्र ती नेहमीच याकडे दुर्लक्ष करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘बिग बॉस ओटीटीनंतर लोकांनी मला नोटीस करायला सुरुवात केली. लोक मला माझ्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखतात. अर्थात त्यांनी मला ट्रोल केलं तरीही मी त्यांना यात बिझी ठेवते. ते माझ्याबद्दल बोलतात.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urfi javed comment on her fashion and style said i like to ware dress like this mrj

First published on: 17-01-2022 at 19:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×