scorecardresearch

Video: उर्फी जावेदचा कारनामा, पायात नाही तर हातात घातली जीन्स; अतरंगी कपड्यांमधील नवीन व्हिडीओ पाहिलात का

उर्फी जावेदचा जीन्स ड्रेस, नेटकरी म्हणाले…

urfi javed video
उर्फी जावेदचा व्हिडीओ चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीचे चित्र-विचित्र कपड्यांमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अतरंगी कपड्यांमधील फोटोंमुळे उर्फी लक्ष वेधून घेत असते. पुन्हा एकदा उर्फी तिच्या हटके ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

कधी वायर तर कधी फोटोंचा ड्रेस घालणाऱ्या उर्फीने आता जीन्सपासून ड्रेस बनवला आहे. पायात नाही तर हातात जीन्स घालत उर्फीने फॅशन केली आहे. उर्फीचा नव्या लूकमधील व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “कंगना रणौतबरोबर तुला वादच नको होता” म्हणणाऱ्याला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तिने मुख्यमंत्र्यांनाही…”

हेही वाचा>> Video: जयदीपने बुटातील पाणी चहाच्या कपमध्ये टाकलं अन्…; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

एकाने कमेंट करत “आता मुलींना माहीत झालं जीन्स फक्त पायात घालता येत नाही”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पॅण्टचा टॉप बनवला वाह उर्फी”, अशी कमेंट केली आहे. “तू कधीच निराश करत नाहीस. नेहमी पहिल्यापेक्षा जास्त चांगला ड्रेस घालून फॅशन करतेस”, अशी कमेंटही एका युजरने केली आहे.

हेही पाहा>> Photos: नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडे अन्…; वनिता खरातच्या हातावर रंगली सुमितच्या नावाची मेहेंदी, पाहा खास फोटो

उर्फीच्या कपड्यांवरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. तिच्याविरोधात पोलिसांतही चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी उर्फीने पोलिसांत जबाब नोंदवला होता. तसंच चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत व महिला आयोगाकडे उर्फीने तक्रार दाखल केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:43 IST
ताज्या बातम्या