scorecardresearch

“कंगना रणौतबरोबर तुला वादच नको होता” म्हणणाऱ्याला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तिने मुख्यमंत्र्यांनाही…”

कंगना रणौतबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर उर्फी जावेदचं उत्तर

urfi javed on kangana ranaut
कंगना रणौतबाबतच्या प्रश्नावर उर्फी जावेदचं उत्तर(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. चित्रा वाघ यांच्याबरोबरील शा‍ब्दिक युद्धानंतर उर्फी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबतच्या ट्वीटला रिप्लाय दिल्यामुळे चर्चेत आली होती. फक्त खान नावाच्या व मुस्लीम अभिनेत्रींना या देशाने प्रेम दिलं असं कंगनाने म्हटलं होतं. त्यावर उर्फी जावेदने कलाकाराला धर्म नसतो, असा रिप्लाय दिला होता.

कंगनाने उर्फीच्या या ट्वीटला उत्तर दिलं होतं. परंतु, उर्फीने व्यंगात्मक पद्धतीने कंगनाच्या ट्वीटला रिप्लाय दिला होता. उर्फीच्या या ट्वीटवर एका नेटकऱ्याने कमेंट “यावरुन तुला कंगना रणौतबरोबर वादच नको होता असं वाटत आहे”, अशी कमेंट केली होती. नेटकऱ्याच्या या कमेंटवर उर्फीने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”

urfi javed

हेही पाहा>> Photos: नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडे अन्…; वनिता खरातच्या हातावर रंगली सुमितच्या नावाची मेहेंदी, पाहा खास फोटो

उर्फीने “कंगनाबरोबर थोडी पंगा घ्यायचा आहे यार. तिने मुख्यमंत्र्यांनाही सोडलेलं नाही”, असं म्हणत कमेंट केली आहे. उर्फीने दिलेल्या या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  उर्फी चित्र-विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत असतात.

हेही वाचा>> Video: जयदीपने बुटातील पाणी चहाच्या कपमध्ये टाकलं अन्…; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

उर्फी एक अभिनेत्रीही आहे. तिने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस हिंदी’मध्येही उर्फी सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:01 IST