मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. शिवाय उर्फीनेही चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “गलिच्छ राजकारणासाठी…” उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्यामधील वादावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
girls presents old famous advertisement video goes viral on social media
90’s चा काळ कधी परत येणार नाही! तरुणींनी दाखवली जुन्या लोकप्रिय जाहिरातींची झलक, Video एकदा पाहाच
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

“उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खासगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसांत तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी.” असं पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

पाहा व्हिडीओ

आता उर्फीचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी छायाचित्रकार उर्फीला तुझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना तू काय सांगशील? असं विचारतात. यावर उर्फी म्हणते, “प्रेमाचं माहित नाही पण माझा नंगानाच सुरूच राहिल.”

आणखी वाचा – विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

उर्फीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोलही केलं आहे. ही पागल मुलगी आहे, तुझं हे कृत्य लवकरच थांबवण्यात येईल, ही नेहमी विमानतळावर काय करते अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.