scorecardresearch

Urfi Javed meets Javed Akhtar : जावेद अख्तर यांच्यासह फोटो शेअर करत उर्फी म्हणाली, “माझे आजोबा…”

कित्येक ठिकाणी उर्फीला जावेद अख्तर यांची नात म्हणूनही संबोधलं जायचं

Urfi Javed meets Javed Akhtar : जावेद अख्तर यांच्यासह फोटो शेअर करत उर्फी म्हणाली, “माझे आजोबा…”
फोटो : सोशल मीडिया

Urfi Javed meets Javed Akhtar : सध्या मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद रोज एक नवं वळण घेत आहेत. चित्रविचित्र फॅशनमुळे उर्फी कायमच चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या याच कपड्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. नुकताच उर्फीने ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे.

उर्फीने जावेद अख्तर यांच्याबरोबर शेअर केलेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा फोटो शेअर करत उर्फीने लिहिलं की, “अखेर मी माझ्या आजोबांना भेटले, ते एक दिग्गज कलाकार आहेत. लोकांनी त्यांच्यासमोर सेल्फीसाठी रांग लावली, पण त्यांनी कोणाचंही मन दुखावलं नाही, आणि संगळ्यांशी त्यांनी संवादही साधला, हे पाहून त्यांच्याबद्दल आदर आणखी वाढला आहे.”

आणखी वाचा : Video : परवानगीशिवाय वरुण धवनने केलं कियारा अडवाणीला कीस अन्…

२०२१ मध्ये उर्फी जावेद ही जावेद ही जावेद अख्तर यांच्या परिवारातील आहे असा एक गैरसमज निर्माण झाला होता. कित्येक ठिकाणी उर्फीला जावेद अख्तर यांची नात म्हणूनही संबोधलं जायचं आणि त्यांना ट्रोल केलं जात असे. खुद्द जावेद अख्तर यांची पत्नी शबाना आजमी यांनी हे मुद्दे खोडून काढले होते. “उर्फीचा आमच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, उगाच खोटं पसरवू नका.” असं वक्तव्य तेव्हा शबाना यांनी केलं होतं.

urfi javed post
urfi javed post

उर्फीलाही तेव्हा बऱ्याच लोकांनी याच मुद्दयावरून भंडावून सोडलं होतं. यानंतर वैतागून उर्फीने एक टी-शर्ट परिधान केला होता, ज्यावर ‘मी जावेद अख्तर यांची नात नाही’ असं ठळक अक्षरात लिहिलं होतं. हा टी-शर्ट घालून उर्फी बऱ्याचदा मीडियासमोर आली होती, तेव्हा याची चांगलीच चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 12:57 IST

संबंधित बातम्या