scorecardresearch

हाय हिल्सच्या नादात उर्फी जावेदचा गेला तोल, व्हायरल व्हिडीओमुळे होतेय प्रचंड ट्रोल

हटके फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

urfi javed hot look, urfi javed viral video,
हटके फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आणि चर्चेत असणारं नाव म्हणजे उर्फी जावेद. उर्फी तिच्या फॅशनमुळे सतत चर्चेचा विषय ठरत असते. फॅशनच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करण्याचा तिचा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याचदा उर्फीला तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. तर काहीवेळा तिच्या ड्रेसिंग स्टाइलचं कौतुक देखील केलं जातं.


सध्यातरी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने हाय हिल्स परिधान केले आहेत. इतकंच नव्हे तर फ्रंट कट असणारा पांढऱ्या रंगाचा ड्रेस उर्फीने परिधान केला आहे. हा तिचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे हाय हिल्समध्ये तिचा तोल गेला.


उर्फीचा हाय हिल्स घालण्याचा अट्टाहास आणि त्यातच फ्रंट कट असलेला ड्रेस तिच्यासाठी अडचण ठरला. चालत असताना उर्फीचा पाय सतत ड्रेसमध्ये अडकत होता. ड्रेस सावरत तिला हिल्समध्ये चालणंही अशक्य झालं असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही तिला ट्रोल केलं आहे.


इतकंच नव्हे तर उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या व्हिडीओबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. “आज माझ्या वॉर्डरोबमध्ये चुकी झाली. पण याचा मोठा मुद्दा बनवू नका. अशाप्रकारच्या गोष्टी या घडतच राहतात,” असे उर्फीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. उर्फीचा प्रत्येक लुक हा टॉक ऑफ द टाऊन असतो. भलत्याच फॅशनच्या नादात आता पुन्हा एकदा ती सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urfi javed weird fashion and actress disbalance in high heels video viral on social media kmd