scorecardresearch

Video- उर्वशी रौतेलाच्या मानेवर लव्ह बाइटच्या खुणा? काय आहे व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

urvashi rautela, urvashi rautela instagram, urvashi rautela video, urvashi rautela angry reaction, उर्वशी रौतेला, उर्वशी रौतेला व्हिडीओ, उर्वशी रौतेला लव्ह बाइट व्हिडीओ, उर्वशी रौतेला इन्स्टाग्राम
उर्वशीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मानेवर दिलेल्या खुणा या लव्ह बाइटच्या असल्याचं म्हणत तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर बराच मोठा चाहतावर्ग असलेल्या उर्वशीच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आताही उर्वशीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यावरून उठलेल्या अफवांवर उर्वशीने संताप व्यक्त केला आहे. उर्वशीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या मानेवर दिलेल्या खुणा या लव्ह बाइटच्या असल्याचं म्हणत तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. आता यावर उर्वशीनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

उर्वशी रौतेलानं तिच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्याची बरीच चर्चा होताना दिसतेय. उर्वशीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘संतापजनक! हे माझ्या लाल लिपस्टिकचे डाग आहेत. जे मी लावलेल्या मास्कमुळे इकडे तिकडे पसरले आहे. कोणत्याही मुलीसाठी लिपस्टिक हॅन्डल करणं नेहमीच कठीण काम असतं. पण त्यावरून माझी प्रतिमा बिघडेल असं माझ्याबद्दल कोणी लिहू शकतं. यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवण्यापेक्षा माझ्याबद्दल काही चांगलं लिहिण्याचा प्रयत्न का नाही केला जात.’

उर्वशी रौतेलानं हा व्हिडीओ स्वतःच तिच्या इन्स्टाग्रामावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती लाल रंगाचा टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये दिसली होती. लाल लिपस्टिक, काळा गॉगल आणि काळ्या रंगाचे स्टायलिश बूट अशा लुकमध्ये उर्वशी कमालीची सुंदर दिसत होती. पण यावर केलेल्या काही वाईट कमेंट आणि अफवांमुळे उर्वशी वैतागली आहे. ज्यानंतर तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- ‘मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा…’ रणबीर कपूरसोबतच्या नात्यावर आलियानं सोडलं मौन

अर्थात फक्त उर्वशीच नाही तर इतरही अभिनेत्रींना अनेकदा अशाप्रकारच्या कमेंट आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूला एका युजरनं विचित्र प्रश्न विचारला होता. त्यावर तिनंही या युजरला जशास तसं उत्तर देलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urvashi rautela angry reaction on viral video and fake news about love bite on her neck mrj

ताज्या बातम्या