‘चेटकीण’, अनोख्या फोटोशूटमुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल

उर्वशी रौतेलाचा फोटोशूटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशीने पक्ष्याचे रुप घेतल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

urvashi rautella,
या व्हिडीओमध्ये उर्वशीने पक्ष्याचे रुप घेतल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्वशी फक्त फिटनेससाठी नाही तर फॅशनसाठीही ओळखली जाते. उर्वशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच उर्वशीने सोशल मीडियावर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

उर्वशीने हे व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओत उर्वशीने सिल्वर रंगाच्या शिमरी ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसला स्लीव्हच्या जागी पंख आहेत. उर्वशीने दागिने घातले आहेत. हे दोन्ही व्हिडीओ शेअर करत उर्वशीने प्रेरणादायी कोट लिहिले आहेत.

आणखी वाचा : “तिला फक्त मनोरंजनासाठी ठेवलं…”, करण जोहर आणि करीना व्यतिरिक्त कोणालाही आवडत नव्हती ‘पू’

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी उर्वशीच्या स्टाईलची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘रावणाचा ड्रेस कुठे आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘गरुड.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘असे कपडे परिधान करून लोकप्रिय होणं आवडतं.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘मला हा व्हिडीओ आवडला नाही.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘चेटकीण’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं होतं भाष्य म्हणाली…

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान उर्वशी ‘ब्लॅक रोज’ आणि ‘तिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Urvashi rautela photoshoot in difference outfit actress trolled dcp