scorecardresearch

ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

या पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…
उर्वशी रौतेला ऋषभ पंत

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी येत असताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या या स्पोर्ट्स कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहे. त्यातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्या दोघांमध्ये नेहमीच विविध कारणांमुळे चर्चा असते. त्यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्या दोघांदरम्यान रंगलेल्या इन्स्टा वॉरवरून सर्वांना त्यांच्यातील वादाची माहिती झाली. ऋषभ पंतच्या अपघाताची माहिती मिळताच उर्वशी रौतेलाने एक पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात; देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरू

उर्वशीने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला तिने ‘प्रार्थना करत आहे,’ असे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर तिने पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट केल्या आहेत. “वहिनी ऋषभ पंतचा अपघात झाला आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर “ऋषभचा अपघात झाला आहे, तुला समजलं की नाही”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: “गरज पडल्यास त्याच्यासाठी…”; उत्तराखंडच्या CM चे निर्देश! जाणून या अपघातासंदर्भातील १० अपडेट्स

आणखी वाचा : ऋषभ पंतपाठोपाठ ऑस्ट्रेलियाला गेलेल्या उर्वशी रौतेलाने दिले स्पष्टीकरण, म्हणाली…

दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हरिद्वार जिल्ह्यामध्ये रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 11:39 IST

संबंधित बातम्या