scorecardresearch

कॅमेरा पाहताक्षणी पॅन्ट खाली खेचत अभिनेत्रीने दिली बोल्ड पोज, व्हिडीओ व्हायरल

सध्या तिच्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे वाणी कपूर. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटाद्वारे वाणीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन दिले आहेत. विशेष म्हणजे तिने दिलेले हे सीन अद्यापही चर्चेत असतात. दरम्यान नुकतंच अभिनेत्री वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटदरम्यानचा बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

वाणी कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच वाणी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. वाणी कपूरचा हा व्हिडीओ एका फोटोशूटदरम्यानचा आहे. यात ती विविध पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच यातील एका पोजमध्ये वाणी कपूर ही तिच्या पॅन्टला हात लावून तिला खाली खेचत पोज देऊन फोटोशूट करताना दिसत आहे. तिने तिच्या या व्हिडीओला फार वेगळे कॅप्शन दिले आहे. सोन्याच्या शोधात बरेच लोक चांदीला विसरतात, असे कॅप्शन तिने हा व्हिडीओ शेअर करताना दिले आहे. तिचा हा बोल्ड व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

या फोटोशूटदरम्यान वाणीने चंदेरी वर्क असलेली आणि पांढऱ्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यासोबत तिने त्याच रंगाची सैल पायजमाही परिधान केला आहे. त्यासोबत तिने हलकासा मेकअपक केला असून केस मोकळे सोडले आहेत.

“ती जगासाठी स्टार, पण माझ्यासाठी…”, प्रियांका चोप्राविषयी प्रश्न विचारताच परिणीतीने दिले उघड उत्तर

दरम्यान वाणी कपूरचा ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात वाणीसोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट १० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील किसिंग सीनची फार चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaani kapoor flaunts her perfect curves in a tiny bikini paired with white pants video viral nrp

ताज्या बातम्या