‘रईस’  या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला ट्रेनप्रवास अभिनेता शाहरूख खान याला महागात पडण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरूखने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने प्रवास मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला होता. मात्र, यावेळी वडोदरा स्थानकावर शाहरूख खानला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. यामध्ये फरहीद खान या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शाहरूख खानला मोठ्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेचे पोलीस उपअधिक्षक तरूण बरोत यांनी शाहरूख खान आणि एक्सेल एन्टरटेन्मेंटवर गुन्हा दाखल करावा, असे सुचवले आहे. त्यांनी १७ एप्रिल रोजी यासंबंधीचा अहवाल न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केला होता. या अहवालात शाहरूख खान आणि एक्सेल एन्टटेन्मेंटवर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी  कलम ३०४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे. शाहरूख खानमुळे या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शाहरूखने चाहत्यांच्या दिशेने टी-शर्टस आणि चेंडू फेकले. ही कृती सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारी होती. शाहरूख खानने गर्दीच्या दिशेने टी-शर्ट, चेंडू  आणि इतर वस्तू फेकल्या नसत्या तर चेंगराचेंगरीचा प्रसंग घडलाच नसता. त्यामुळे शाहरूख आणि एक्सेल एन्टरटेन्मेंटवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे अहवालात म्हटले आहे.

शाहरूखच्या मुलावर होणार शस्त्रक्रिया

‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख खानने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने प्रवास केला होता. २३ जानेवारीला ही गाडी वडोदरा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर रेल्वे १० मिनिटे थांबली होती. या वेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. जेव्हा रेल्वे थांबली तेव्हा गर्दी अनावर झाली. त्यांनी रेल्वे डब्यांच्या खिडक्या वाजवण्यास सुरूवात केली. या दरम्यान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले त्याचे चाहते एकमेकांवर पडले. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीमार करावा लागला. रेल्वे निघाल्यानंतर चाहतेही रेल्वेबरोबर पळू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. यात एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.

शाहरूख खानवर आलिया भट्ट का आहे नाराज?