PHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन | Loksatta

PHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन

त्याच्यासोबतचे काही सुंदर फोटो ती पोस्ट करत असते.

PHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन
एकता कपूर

टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारं आणि कलाविश्वात आपलं असं वेगळं अस्तित्वं निर्माण करणारं एक नाव म्हणजे एकता कपूर. ‘डेली सोप क्वीन’ म्हणूनही एकता ओळखली जाते. विविध धाटणीच्या मालिका आणि त्या हाताळण्याची तिची अनोखी पद्धत या सर्व गोष्टींमुळे तिच्याकडे एक यशस्वी महिला म्हणूनही पाहण्यात येते. कामाच्या व्यापात स्वत:ला वाहून घेतलेल्या एकताच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतं.

आपल्या खासगी आयुष्याविषयी फार गोष्टी उघड न करणाऱ्या एकताने सध्या सोशल मीडियावर चक्क तिच्या व्हॅलेंटाइनचा फोटो पोस्ट केला आहे. साधारण आठवडाभरापासून सुरु झालेल्या व्हॅलेंटाइन वीकचे आणि येऊ घातलेल्या व्हॅलेंटाइन डेचे वारे सध्या सर्वत्र वाहात आहेत. त्यातच आता एकताने तिच्या व्हॅलेंटाइनचा फोटो शेअर केल्यामुळे ‘तो’ नेमका आहे तरी कोण, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. या प्रश्नाचं इत्तर शोधण्यासाठी फार तर्क लावण्याची गरज नाही. कारण, एकताने तिचा व्हॅलेंटाइन म्हणून तिच्या भाच्याचा म्हणजेच लक्ष्यचा फोटो शेअर केला आहे.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

एकताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य हातात एक छोटेसे फुल घेतल्याचे दिसत असून, त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव सर्वांचेच मन जिंकत आहेत. लक्ष्यवर एकताचा खूपच जीव असून ती नेहमीच त्याच्याविषयी काही प्रश्न विचारले असता आपुलकीने उत्तरं देते, सोशल मीडियावरही त्याच्यासोबतचे काही सुंदर फोटो ती पोस्ट करत असते. त्यामुळे लक्ष्यच्या रुपात यंदा एकताला तिचा गोंडस आणि लाडाचा व्हॅलेंटाइन भेटलाय असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2018 at 13:53 IST
Next Story
‘त्या’ घोड्यासाठी दोन कोटी रुपये मोजण्यास सलमान राजी, पण…