एस.एस.राजामौली हे भारतातील सर्वात्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ‘बाहुबली’ पाठोपाठ त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ऑस्कर नामांकनांवरून गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे नाव ऑस्कर नामांकानांच्या यादीत वरच्या बाजूला असल्याचे म्हटले जात असून या चित्रपटाला दोन नामांकनं मिळण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तवले गेले आहे.

हेही वाचा : आर्यन खानला चाहत्याने दिला गुलाब, पुढे त्याने केलेल्या कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai Court refuses to stay release of Maidaan
अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘व्हरायटी’ या आंतरराष्ट्रीय मासिकाने एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला ऑस्कर २०२३ मध्ये एक नव्हे, तर दोन विभागांमध्ये नामांकन मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. ही बातमी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक ‘व्हरायटी’नुसार, ‘आरआरआर’ चित्रपटाला ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’ या विभागात ‘दोस्ती’ या गाण्यासाठी पहिले नामांकन मिळेल, तर ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात ‘आरआरआर’ला दुसरे नामांकन मिळू शकते.

‘आरआरआर’ला जर ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागात नामांकन मिळाले तर ‘अर्जेंटिना १९८५’, ‘बार्डो’, ‘क्लोज’ आणि ‘होली स्पायडर’ हे चित्रपट त्याचे प्रतिस्पर्धी चित्रपट असतील असेही ‘व्हरायटी’ या अंतरराष्ट्रीय मासिकाने म्हटले. पण अकादमी पुरस्कारांकडून ‘ऑस्कर २०२३’ च्या नामांकनांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ती यादी येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते असे बोलले जात आहे.

आणखी वाचा : एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट असणार ‘या’ जॉनरचा, महेश बाबू साकारणार मुख्य भूमिका

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते. दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. त्यासोबतच या चित्रपटात बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि अजय देवगणने दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.