वाजवा रे वाजवा! वरुण-नताशाचं ठरलं, ‘या’ महिन्यात करणार लग्न

वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार

वरुण धवन-नताशा दलाल

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार लग्नाच्या बोहल्यावर चढलेले पहायला मिळत आहेत. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्माने यांच्या पाठोपाठच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे लग्न बंधनात अडकले. त्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्राने विलायती बाबू निक जोनासशी लग्न केलं. आता सध्या चर्चा सुरु आहे ती वरुण धवनच्या लग्नाची.

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अभिनेता वरुण धवनने नाताशासोबत असलेल्या नात्याला दुजोरा दिला. तसेच तो गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचेही सांगितलं आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाची जोरदार तयार सुरु केली असून हा लग्नसोहळा डिसेंबरमध्ये पार पडणार असल्याचं समजतंय.

अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांना नेहमी डिनर डेट, मूव्ही डेटला जाताना पहायला मिळालं होतं. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्यांच्या लग्नाची.

‘कलंक’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये वरुण धवन सध्या व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसेच आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि कुणाल खेमु हे देखील चित्रपटात काम करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Varun dhawan get married to natasha dalal in december