डब्ल्युडब्ल्युईच्या रिंगणात एकत्र आले वरुण धवन- ट्रिपल एच

सीट्स दिल्याबद्दल तुझे आभार ट्रिपल एच

वरुण धवन आणि ट्रिपल एच
वरुण धवन हा डब्ल्युडब्ल्युईचा प्रचंड चाहता आहे. हे आम्ही नाही तर त्याचे डब्ल्युडब्ल्युईच्या स्पर्धकांसाठी असलेले वेड सांगते. सध्या वरुण त्याच्या आगामी ऑक्टोबर सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण तरीही त्याने वेळात वेळ काढून डब्ल्युडब्ल्युईच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. डब्ल्युडब्ल्युईचा हा कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. डब्ल्युडब्ल्युईचा सुपरस्टार ट्रिपल एचचे भारतात प्रचंड चाहते आहेत. लाखो चाहत्यांमध्ये वरुण धवनच्या नावाचाही  समावेश करावा लागले. यावेळी वरुणने फक्त ट्रिपल एचचीच भेट घेतली असे नाही तर तो जिंदल महाल, सशा बँक्स यांनाही भेटला.

https://www.instagram.com/p/BcfGfb8H-So/

https://www.instagram.com/p/Bceh3VtnyT4/

वरुणने त्याच्या आवडत्या हिरोंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्याने, ‘ट्रिपल एचला भेटून फार आनंद झाला. सीट्स दिल्याबद्दल तुझे आभार ट्रिपल एच,’ असे ट्विटही केले. यानंतर ट्रिपल एचने वरुणसोबतचे फोटो शेअर करत म्हटले की, ‘मलाही तुला भेटून आनंद झाला. पहिल्यांदा डब्ल्युडब्ल्युईच्या रिंगणात येऊन तुला मजा आली असेल अशी अपेक्षा आहे.’

https://www.instagram.com/p/BcfFOxFnIgj/

वरुणने जिंदल महालसोबतही एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘जिंदल फारच विनम्र असून अजूनही त्याचे पाय जमिनीशी जोडले गेले आहेत.’ वरुणने त्याला आधुनिक जगाचा महाराजा म्हटले. तसेच  डब्ल्युडब्ल्युईमध्ये त्याला जे यश मिळाले त्यासाठी तो योग्यच असल्याचे म्हटले.

 

यावेळी वरुणने साशा बँक्ससोबतही एक फोटो शएअर करत ती खूप सुंदर दिसत असून ताकदवानही आहे. एकंदरीत डब्ल्युडब्ल्युईच्या रिंगमध्ये जाऊन वरुण भलताच खूश झालेला दिसतो. त्याने या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओही शेअर केला. त्याच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर फार चर्चा होत असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Varun dhawan meets triple h jinder mahal wwe india event photos

ताज्या बातम्या