२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘मकडी’ या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली श्वेता प्रियकर मित्तलसोबत लग्न करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या श्वेताने अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वरुण धवनचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटामध्ये श्वेताने वरुणच्या वहिनीची भूमिका वठविली आहे. कलाविश्वात वावर असणारी श्वेता ४ वर्षापासून फिल्ममेकर रोहित मित्तलला डेट करत होती आणि अखेर येत्या १३ डिसेंबर रोजी ती रोहितसोबत लग्न करणार आहे.

श्वेता आणि रोहित पुण्यात बंगाली आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार असून यावेळी केवळ त्यांच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे लग्ननंतर या जोडीने मित्रपरिवारासाठी मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे.

दरम्यान, श्वेता आणि रोहितने या वर्षी जूनमध्ये रोहितसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी बॅचलर पार्टीचंदेखील आयोजन केलं होतं. या पार्टीचे फोटोही श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केले . श्वेताने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटात काम केलं आहे. कहानी घर-घर की, करिश्मा का करिश्मा आणि चंद्रनंदिनी या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan onscreen bhabhi shweta basu prasad will married
First published on: 30-11-2018 at 14:22 IST